नथिंग फोन (1) लाँच होऊन जवळपास एक महिना उलटून गेला आहे. १२ जुलै रोजी लाँच झालेल्या पहिल्या Nothing स्मार्टफोननंतर, अलीकडेच कंपनीचा दुसरा फोन Lite Version बद्दल बातम्या येऊ लागल्या आहेत. लंडन-आधारित स्टार्टअपमधील कार्ल पेईचा दुसरा फोन नथिंग फोन (1) च्या लाइट वर्जनवर काम करत असल्याची चर्चा आहे, जो बॅक पॅनेलवरील Glyph लाइटशिवाय येतो. मात्र आता कार्ल पेईने ट्विटरवर अशा चर्चांना पूर्णविराम दिलाय.

कार्ल पेईने मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरवर माहिती दिली आहे की, सध्या लाइट नथिंग फोनबाबत कोणतीही योजना नाही. एका ताज्या ट्विटमध्ये, Krl Pei ने Android Police यांच्या ट्विटचा हवाला देत सांगितले की, Gylph शिवाय आगामी Nothing Phone बद्दलची चर्चा ही केवळ एक अफवा आहे.

Loksatta kutuhal Endowment of Suryaji Pisala Artificial intelligence
कुतूहल: सूर्याजी पिसाळांचा बंदोबस्त
diy barley water summer benefits hydration uti why you must include a glass of barley water to summer routine
उन्हाळ्यात रोज प्या एक ग्लास बार्लीचे पाणी; मिळतील डॉक्टरांनी सांगितलेले ‘हे’ जबरदस्त फायदे
pegasus apple advisory
iPhone वर ‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरचे संकट, खासगी डेटावर हॅकर्सची संभाव्य ‘नजर’; उपाय काय?
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका

नथिंग फोन (1) च्या लाइट व्हेरिएंटबद्दल खात्री केल्यानंतर, हे स्पष्ट आहे की सध्यातरी नथिंगच्या चाहत्यांकडे फक्त एकच पर्याय असेल. Nothing चा पुढील स्मार्टफोन हा फोन (1) पेक्षा जास्त पॉवरफूल व्हेरिएंट असण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा : मेडिकल ग्रेड देणारी जगातील पहिली भन्नाट स्मार्टवॉच भारतात लाँच, पाहा काय आहे खास?

लीकमध्ये हे उघड झाले आहे की, नथिंग दोन नवीन ऑडिओ प्रोडक्टवर देखील काम करत आहे. एका ट्विटमध्ये, टिपस्टर मुकुल शर्मा (@stufflistings) यांनी सूचित केले की, नथिंग बी155 आणि नथिंग बी157 या दोन्ही फोनवर काम सुरू आहे आणि या दोघांना SGS Fimko प्रमाणपत्र मिळाले आहे.

नथिंग B157 ला देखील तेच BIS प्रमाणपत्र प्राप्त झाले आणि ते नथिंग फोन (1) सोबत नथिंग इअर (1) स्टिक म्हणून लॉंच केले जाणे अपेक्षित होते. पण आता या दोन्ही इयरबड्स लाँच करण्यासाठी Nothing कंपनी वेगळ्या लॉंच इव्हेंटचे आयोजन करेल, असं दिसत आहे. सध्या या इअरबड्सबद्दल इतर कोणतीही माहिती उपलब्ध नाही. भारतात या इअरबड्सच्या प्रवेशाबाबत अद्याप काहीही माहिती नाही.