scorecardresearch

Nothing Phone (1): लाँचपूर्वीच Transparent फोनची भारतात प्री-बुकिंग सुर, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

वनप्लसचे सह-संस्थापक कार्ल पेई यांनी स्थापन केलेल्या स्टार्टअपने खात्री दिली आहे की सेल सुरू होण्यापूर्वी युजर नथिंग फोन (1) हा नवीन प्री-ऑर्डर इन्वाइट ओन्ली सिस्टमद्वारे खरेदी करू शकतील.

nothing-phone-1

Nothing १२ जुलै रोजी भारतात आपला पहिला स्मार्टफोन नथिंग फोन (1) लाँच करेल. आता वनप्लसचे सह-संस्थापक कार्ल पेई यांनी स्थापन केलेल्या स्टार्टअपने खात्री दिली आहे की सेल सुरू होण्यापूर्वी युजर नथिंग फोन (1) हा नवीन प्री-ऑर्डर इन्वाइट ओन्ली सिस्टमद्वारे खरेदी करू शकतील. अनेक वर्षांपूर्वी OnePlus One स्मार्टफोन लॉन्‍चच्‍या वेळी OnePlus ने देखील Invite-only प्रणाली लाँच केली होती. या प्रणालीद्वारे, काही युजर्स लॉन्चपूर्वी फोन प्री-बुक करू शकतील.

Nothing Phone (1) प्री-ऑर्डर इन्वाइटबद्दल सर्वकाही जाणून घ्या…

Nothing phone (1): How to pre-book the device?
नथिंग फोन (१) प्री-बुक करण्यासाठी, in.nothing.tech या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यानंतर शीर्षस्थानी दर्शविलेल्या Pre-Booking विभागात जा. त्यानंतर Learn More वर क्लिक करा आणि Join The Waitlist बटणावर टॅप करा.

साइन इन केल्यानंतर युजर्स नोंदणी करण्यास सक्षम असतील. कृपया त्याच ईमेल आयडीने नोंदणी करा ज्याने तुम्ही फ्लिपकार्टवर नोंदणी केली आहे. जर असे झाले नाही तर तुम्हाला इन्वाइट मिळू शकणार नाही आणि फोन खरेदी करू शकणार नाही.

तुम्हाला तुमच्या नंबरवर Nothing वरून ईमेलद्वारे आमंत्रण मिळेल. तोपर्यंत, तुम्ही Nothing च्या वेबसाइटवर तुमच्या प्रोफाइल पेजला भेट देऊन तुमचा नंबर तपासू शकता आणि तुमच्या मित्रांना रेफर करू शकता.

आणखी वाचा : तुमच्या फोनमधून हे १७ धोकादायक Apps ताबडतोब डिलीट करा, पूर्ण यादी पाहा

Nothing phone (1): How will the invite-only system work?
Nothing च्या वेबसाइटवर नोंदणी करण्यासाठी डिव्हाइस प्री-बुक करू इच्छिणाऱ्या युजर्सना Nothing ने आमंत्रित केले आहे. पण काही प्रायव्हेट कम्युनिटी मेंबर्सना आमंत्रण कोडची आवश्यकता नाही. दुसरीकडे फोन प्री-बुक करण्यासाठी इतर युजर्सना वेटलिस्ट जॉईन करावी लागेल.

जे युजर्स फोन प्री-बुक करतील ते त्यांचा नंबर वेटलिस्टमध्ये पाहू शकतील आणि जे युजर्स इतर युजर्सना डिव्हाइस प्री-बुकिंगसाठी रेफर करतात, त्यांचा नंबर वेटलिस्टमध्ये पुढे नेला जाईल. वेटलिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या युजर्सना २००० रुपये प्री-बुकिंग रक्कम भरावी लागेल. नंतर १२ जुलै रोजी फोन लॉन्च झाल्यानंतर ही रक्कम फोनच्या किंमतीतून कमी केली जाईल.

आणखी वाचा : Vivo V25E स्मार्टफोन लवकरच भारतात दाखल होईल, संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या…

नथिंग फोन (1) १२ जुलै रोजी लॉन्च केला जाईल आणि युजर्स फ्लिपकार्टवर लॉग इन करू शकतील आणि २००० रुपयांची सूट घेऊ शकतील. या व्यतिरिक्त फोन प्री-बुक करणार्‍या यूजर्सना काही खास ऑफर्स देखील मिळतील. अजून काहीही माहिती दिलेली नाही. १२ जुलै रोजी फोन लॉन्चच्या दिवशी अधिक माहिती मिळण्याची अपेक्षा आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-06-2022 at 21:53 IST
ताज्या बातम्या