या महिन्यात १२ जुलै रोजी Nothing Phone (1) लाँच होत आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा फोनचा ग्लोबल लाँच आहे. परंतु, कंपनीने सर्वप्रथम भारतात त्याची विक्री जाहीर केली आहे. फोनबद्दल आत्तापर्यंत बरेच लीक्स आले असले तरी फक्त किंमत बाकी होती. तर यावेळी, नथिंग फोन १ ची किंमत देखील आज लीक झाली आहे. बातमीनुसार, हा फोन भारतीय बाजारात ३४,९९९ रुपयांना लाँच केला जाईल. किंमतीबाबत एक ट्विट समोर आले आहे, ज्यामध्ये फोनच्या किंमतीसह कॅमेराबद्दल माहिती आहे. या फोनमध्ये ५०एमपी मेन कॅमेरा आहे तर कंपनीने Sony IMX766 सेंसर वापरला आहे.

राहुल शर्मा नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हे ट्विट करण्यात आले आहे. जिथे या किंमतीसोबत फोनच्या मेमरी वेरिएंटचीही माहिती देण्यात आली आहे. ट्विटमध्ये शेअर केलेल्या स्क्रीनशॉटनुसार, हा फोन ८जीबी रॅमसह १२८जीबी मेमरीमध्ये उपलब्ध असेल. यासोबतच कलर ऑप्शनमध्ये पांढऱ्या रंगाचा पर्याय आहे. तसंच या फोनच्या मेमरी ऑप्शनमध्ये आणखी दोन पर्याय दिसत आहेत. रंगात आणखी एक पर्याय असून हा पर्याय काळा असेल असे समजण्यात येत आहे. या स्क्रीनशॉटमध्ये, किंमत खाली दिली आहे जिथे बॉक्सची किंमत ३९,९९९ रुपये आहे तर हा फोन ३४,९९९ रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध असेल.

All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
stock market, 3 7 crore dmat accounts
सरलेल्या आर्थिक वर्षात ३.७ कोटी डिमॅट खात्यांची भर
changes in temperature and inflation marathi news, temperature change impact on inflation marathi news
विश्लेषण : उष्णतेच्या झळांमुळे अन्नधान्य महागाई? नवीन संशोधनामध्ये कोणते गंभीर इशारे?
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?

(हे ही वाचा: फक्त ६३६ रुपयांमध्ये घरी घेऊन या Realme 9i स्मार्टफोन; जाणून घ्या स्कीम)

नथिंग फोनचे तपशील (1)

  • ६.५५ इंच OLED पॅनेल, १३०Hz अनुकूली रिफ्रेश दर
  • क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७७८G+ SoC
  • ४,५००mAh बॅटरी, 45W चार्जिंग
  • १२जीबी रॅम, २५६जीबी स्टोरेज पर्यंत
  • ५०एमपी ड्युअल रियर कॅमेरा
  • १६एमपी सेल्फी कॅमेरा

जसे की आम्ही आधीच नमूद केले आहे की Nothing Phone (1) बद्दल अनेक लीक्स आले आहेत, त्यानुसार तुम्हाला या फोनमध्ये ६.५५ इंचाची AMOLED स्क्रीन पाहायला मिळेल. यासोबतच फोनमध्ये १२९Hz रिफ्रेश रेटसह अॅडॉप्टिव्ह रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो. कंपनी याला अॅल्युमिनिअम फ्रेमवर सादर करू शकते, समोर तसेच मागील बाजूस ग्लास फिनिश दिले जाऊ शकते.प्रोसेसरबद्दल बोलायचे झाल्यास, नथिंग फोन (1) ६ नॅनोमीटर फॅब्रिकेशन आधारित क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७७८G + ऑक्टा-कोर प्रोसेसरवर ऑफर केला जाऊ शकतो. यासोबतच फोनमध्ये तुम्हाला ८जीबी आणि ६जीबी रॅमचा पर्याय मिळू शकतो आणि मेमरीसाठी १२८जीबीसह २५६ पर्याय दिले जाऊ शकतात. हा फोन Android १२ वर आधारित असेल, ज्यावर Nothing UI लेयर केले जाऊ शकते.

( हे ही OnePlus 10RT लवकरच भारतात दाखल होणार; जाणून घ्या किंमत आणि बरंच काही

या फोनच्या कॅमेराबद्दल बोलायला गेलं, तर कंपनी ५०एमपी ड्युअल-रियर कॅमेरा सेटअपसह देऊ शकते जिथे मुख्य सेन्सर Sony IMX766 असू शकतो. यासह, अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स अपेक्षित आहे. यासोबतच OIS आणि EIS साठी सपोर्ट दिला जाऊ शकतो. हा ५जी आधारित फोन ४५W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४,७०० mAh बॅटरीसह असेल. १२ जुलै रोजी या फोनचे ग्लोबल लाँच होणार आहे आणि कंपनीने यासाठी यूकेमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला आहे.