आपण दिवसभरात असंख्य वेबसाईट्सचा वापर करतो. काही वेबसाईट्स या सर्वांसाठी उपलब्ध असतात, तर काहींना आधी सब्सक्राइब करावे लागते. या सबस्क्राइब कराव्या लागणाऱ्या वेबसाईटचा पासवर्ड लक्षात ठेवणे अनेकांना त्रासदायक वाटते. हा पासवर्ड जर लक्षात ठेवला नाही तर दुसऱ्यांना ती वेबसाईट वापरताना तुम्हाला नव्याने लॉग इन करावे लागते. पण आता या पासवर्ड लक्षात ठेवण्याच्या त्रासापासून सुटका मिळणार आहे. यासाठी गूगलचे नवे ‘पासकी’ हे फीचर आपल्याला मदत करणार आहे. हे फीचर कसे वापरायचे जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गूगलकडुन ‘पासकी’ हे नवे फीचर लवकरच रोल आऊट होणार आहे. या फीचरमुळे वेगवेगळ्या वेबसाईट्सचे पासवर्ड लक्षात ठेऊन लॉग इन करण्याऐवजी, थेट पिन किंवा बायोमेट्रिक ऑथेंटिफिकेशन वापरून लॉग इन करता येणार आहे. हे फीचर अँड्रॉइड आणि क्रोम दोन्हीमध्ये वापरता येणार आहे. यामुळे युजर्सना सायबर हल्ल्यांपासून अधिक सुरक्षा मिळणार आहे.

आणखी वाचा : BSNL ने लाँच केले २६९ आणि ७६९ रुपयांचे नवे रिचार्ज प्लॅन; यावर काय ऑफर आहे लगेच जाणून घ्या

पासकी हे फीचर पासवर्डससाठी एक सुरक्षित पर्याय आहे. यामध्ये पासवर्ड पुन्हा वापरता येत नाही, तसेच पासवर्ड सर्वरमध्ये सुरक्षित राहतो. पासकी हे फीचर ‘सेव्ह पासवर्ड’प्रमाणे आहे, पण यातील फरक म्हणजे पासकी अधिक सुरक्षित आहे. ‘पासकी’मध्ये फिंगरप्रिंट किंवा फेस स्कॅनचा वापर करून अधिक सुरक्षितरित्या तुम्ही लॉगइन करू शकता.

पासकी फीचर कसे वापरायचे?

  • अजुन या फीचरवर काम सुरू आहे. गूगलकडुन रोल आऊट करण्यात आल्यानंतर तुम्हाला एक पासकी निर्माण करावा लागेल.
  • यासाठी गूगलवर तुम्हाला ‘पासकी’साठी फिंगरप्रिंट, स्क्रीन लॉक, फेस स्कॅन अशी माहिती द्यावी लागेल.
  • त्यानंतर वेबसाईट वापरताना जेव्हा ही माहिती मागितली जाईल तेव्हा ही माहिती देऊन तुम्ही सहजरित्या पासवर्ड लक्षात न ठेवता ती वेबसाईट वापरू शकता.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now users dont need to remember password of different websites google will soon roll out new passkey feature for chrome and android pns
First published on: 15-10-2022 at 12:09 IST