इंस्टाग्रामची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे आणि यामुळे या अ‍ॅपच्या वापरकर्त्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पण काही मंडळी अशी देखील आहेत जे आता इंस्टाग्रामला कंटाळले आहेत आणि सध्या ते या अ‍ॅपपासून ब्रेक घेण्याचा विचार करत आहेत. याचसाठी ते इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करू इच्छित आहेत. परंतु इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करणं इतकं सोपं नाही. मोबाईल अ‍ॅपवर अकाउंट डिलीट करण्यासाठी अद्याप कोणतंही फीचर उपलब्ध नाही. ही सुविधा मोबाईल ब्राऊजरवर किंवा कंप्यूटरच्या इंटरनेट ब्राऊजरवर उपलब्ध आहे. या प्रक्रियेसंबंधी सातत्याने मिळालेल्या तक्रारीनंतर आता इंस्टाग्राम आपल्या वापरकर्त्यांसाठी खास फीचर आणण्याच्या तयारीत आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमचे इंस्टाग्राम अकाउंट आपल्या मोबाईल अ‍ॅपमधूनही डिलीट करू शकणार आहात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कसे असेल नवे फीचर?

रिपोर्टनुसार, मेटाच्या मालकीची ही कंपनी वापरकर्त्यांना नवनवीन फीचर्स देत असते. अकाउंट डिलीट करण्याच्या पर्यायाची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. अशातच कंपनीने आता यावर काम करण्यास सुरुवात केली आहे. सध्या या फीचरवर टेस्टिंग केली जात असून लवकरच हे फीचर इंस्टाग्रामच्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध केले जाईल. या पर्यायामुळे वापरकर्त्यांसाठी आपले इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करणे सोयीचे होणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now we can delete our instagram account from mobile app pvp
First published on: 14-01-2022 at 13:22 IST