व्हॉट्सअ‍ॅप हे सर्वात लोकप्रिय मॅसेजिंग अ‍ॅप आहे. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप असतंच. त्यामुळे कंपनीही वेगवेगळे फिचर्स देत ग्राहकांना आकर्षित करते. आता व्हॉट्सअ‍ॅप नव्या फिचरवर काम करत आहे. या फिचर्सच्या मदतीने आपण आपल्या पसंतीचे स्टिकर्स बनवू शकणार आहोत. सध्या युजर्स फक्त तेच स्टिकर्स वापरू शकतात, जे कंपनीच्या किंवा थर्ड पार्टी अ‍ॅप्सच्या स्टिकर पॅकमध्ये आढळतात. 91 मोबाईलच्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅपमध्ये स्वतःचे स्टिकर्स तयार करणारे फीचर बीटा व्हर्जनमध्ये दिसले आहे. लवकरच नविन फिचर उपलब्ध करून दिले जाईल अशी अपेक्षा आहे. कंपनी स्टिकर्स बनवण्यासाठी काही स्पेशल टूल्स देऊ शकते. स्टिकर क्रिएटर फीचरच्या मदतीने युजर्स कोणतीही इमेज स्टिकरमध्ये बदलू शकतील. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसरीकडे, व्हॉट्सअ‍ॅप लवकरच मेसेज डिलीट करण्याची मुदत वाढवू शकते. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp सध्या आणखी एका नवीन फीचरवर काम करत आहे. हे फीचर सुरू केल्यानंतर, चॅटमध्ये पाठवलेले मेसेज प्रत्येकासाठी ७ दिवस आणि ८ मिनिटांपर्यंत delete for everyone करू शकतात. सध्या युजर्स फक्त १ तास ८ मिनिटे आणि १६ सेकंदात पाठवलेले delete for everyone करू शकतात.

तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक केल्यानंतर, अनेकांना असे वाटते की ग्रुप तयार करून तुम्ही ब्लॉक केलेल्या मित्राला सहज अ‍ॅड करू शकता आणि बोलू शकता. परंतु तुम्ही हे अजिबात करू शकत नाही. यासाठी तुम्हाला दुसऱ्या मित्राची मदत घ्यावीच लागेल. कॉमन फ्रेंडसह, तुम्ही एक ग्रुप तयार करू शकता आणि ज्यांना तुम्हाला मेसेज करायचा आहे त्यांना देखील त्यात अ‍ॅड करू शकता. जर मेसेज खासगी असेल तर तुम्ही त्या कॉमन फ्रेंडला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सोडण्यास सांगू शकता. यानंतर, तुम्ही समोरच्या व्यक्तीशी बोलू शकता आणि त्याला मेसेज पाठवू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On whatsapp the feature of making stickers will come soon rmt
First published on: 24-11-2021 at 17:15 IST