OnePlus चा प्रीमियम बजेट स्मार्टफोन OnePlus 10 Pro 5G भारतात लॉन्च झाला आहे. हे दोन रॅम व्हेरिएंट 8GB आणि 12GB मध्ये सादर केले गेले आहे. हा कंपनीचा नवीन फ्लॅगशिप फोन आहे, जो OnePlus 9 Pro ची अपग्रेडेड वर्जन आहे. यासोबतच वनप्लसने बुलेट वायरलेस Z2 देखील सादर केला आहे.

OnePlus 10 Pro नवीन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 प्रोसेसर सोबत 48MP प्रायमरी कॅमेरा + 50MP अल्ट्रावाइड लेन्स + 8MP टेलिफोटो कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसंच, या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Vivo company New Smartphone T3x 5G launch in India on Know About design and price range of this upcoming model
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्टसह विवोचा ‘हा’ स्मार्टफोन होणार लाँच; किंमत फक्त…
Is this waitress serving at a restaurant in China robot or human
रोबोट आहे की तरुणी? चीनी रेस्टॉरंटमधील वेट्रेसची एकच चर्चा, Video पाहून सांगा, तुम्हाला काय वाटते?
Dolly Chaiwala and Bill Gates
Dolly Chaiwala मायक्रोसॉफ्ट विंडोज १२चा ब्रँड अँबॅसेडर? जाणून घ्या सत्य
Antarctica Post Office
भारतीय टपाल विभागाने रचला इतिहास; अंटार्क्टिकामध्ये सुरु केले नवे पोस्ट ऑफिस

स्‍पेसिफिकेशन
OnePlus 10 Pro मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. फोन पंच होल डिस्प्ले डिझाइन दर्शवतो, ज्यामध्ये सेल्फी कॅमेरा आहे. OnePlus प्रथमच आपल्या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 1 चिपसेट देत आहे. यासोबतच हा Android 12 आणि ColorOS 12 वर चालतो. हे 12GB LPDDR5 रॅमसह जोडले जाऊ शकते. OnePlus 10 Pro 5,000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जरसह येतो.

कॅमेरा: OnePlus 10 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यात 48MP मेन सोनी लेन्स, 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 8MP मॅक्रो शूटरसह मिळतो. 10 Pro मध्ये 32MP सेल्फी कॅमेरा आहे. OnePlus 10 Pro देखील Hasselblad ब्रँडिंगसह येतो.

आणखी वाचा : Samsung ने Galaxy A सीरीजचे ५ स्मार्टफोन लॉन्च केले, किंमत १४,९९९ रुपये, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

किंमत आणि उपलब्धता
OnePlus 10 Pro ने दोन व्हेरिएंट सादर केले आहेत, 8GB / 128GB व्हेरिएंटची किंमत 66,999 रुपये आहे. तर 12GB/256GB व्हेरिएंट मॉडेलची किंमत 71,999 रुपये असेल. ते 5 एप्रिल 2022 पासून Amazon India वरून खरेदी करता येईल. बुलेट वायरलेस Z2 नेकबँडची किंमत 1,999 रुपये आहे. यासोबतच Earbuds Pro TWS 9,990 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे.

OnePlus 10 Pro 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेजसह येतो. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth v5.2, GPS/ A-GPS, NFC आणि USB Type-C पोर्ट समाविष्ट आहेत. बोर्डवरील सेन्सर्समध्ये एक्सेलेरोमीटर, एंबियंट लाइट, जायरोस्कोप, मॅग्नेटोमीटर आणि एक प्रॉक्सिमिटी सेंसर यांचा समावेश होतो. फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह देखील येतो जो रीचॅबिलिटीमध्ये सुधार करण्यासाठी आणि जलद अनलॉकिंग अनुभव देत असल्याचा दावा करण्यात येतोय.