वनप्लसच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये OnePlus 10R हा फोन मोट्या सूटसह मिळत आहे. ३८ हजार ९९९ रुपयांचा हा फोन ३२ हजार ९९९ रुपयांना मिळत आहे. या वर्षी हा फोन लाँच झाला होता. बेस व्हेरिएंट ८० वॉट चार्जिंग सपोर्ट करतो, याने ३० मिनिटांमध्ये फोन चार्ज होऊ शकते. गेमर्ससाठी, तसेच व्हिडिओ पाहणाऱ्यांसाठी हे फायदेशीर ठरू शकते.

सूटसह मिळत आहेत हे ऑफर्स

आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डने हा फोन घेतल्यास तुम्हाला २ हजार रुपयांचे इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. तर आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड इएमआय ट्रॅन्झॅक्शनवर तुम्हाला १ हजार ७५० रुपयांचे इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. तर आयसीआयसीआय बँकेच्या नॉन इएमआय क्रेडिट कार्ड ट्रॅन्झॅक्शनवर तुम्हाला १ हजार रुपयांचे इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. त्याचबरोबर, एक्सचेंज ऑफरमध्ये फोनच्या किंमतीमध्ये १५ हजार ६०० रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे.

(IRCTC : एका पीएनआरवर अनेकांचं तिकीट काढलंय? त्यातील एकाचं तिकीट रद्द करण्यासाठी ‘हे’ करा, अडचणीत ठरते फायदेशीर)

हे आहेत फीचर

OnePlus 10R मध्ये १२८ जीबी इंटरनल स्टोरेज आणि ८ जीबी रॅम देण्यात आली आहे. फोनमध्ये ५ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी दीर्घकाळ फोन वापरण्यात मदत करेल. वनप्लस १० आरमध्ये गतिमान कार्यासाठी मीडियाटेक डायमेन्सिटी ८१०० मॅक्स चीपसेट देण्यात आले आहे. गेमर्ससाठी ते फायदेशीर ठरू शकते. फोनमध्ये ५० मेगपिक्सेलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.