scorecardresearch

OnePlus 9 5G फोन झाला १२,००० रुपयांनी कमी; महिन्याला १,७८९ रुपये देऊन शक्तिशाली स्मार्टफोन घरी आणा

कंपनीने OnePlus 9 5G फोनच्या किंमतीत थेट १२,००० रुपयांनी कपात केली आहे.

OnePlus 9 5G phone becomes Rs 12,000 less
photo(financial express)

वनप्लसने बाजारात प्रवेश केला तेव्हा त्याला फ्लॅगशिप किलर या शीर्षकाने ओळखले गेले. याचे कारण असे की या कंपनीने ६०,००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध स्पेसिफिकेशन्स ४० ते ५० हजार रुपयांच्या किमतीत देणे सुरू केले. त्याच वेळी, आता कंपनीने OnePlus 9 5G फोनच्या किंमतीत थेट १२,००० रुपयांनी कपात केली आहे जे वापरकर्ते कमी बजेटमुळे त्यांचा आवडता OnePlus मोबाइल खरेदी करू शकत नाहीत ते आता हा फोन खरेदी करू शकतात.

OnePlus 9 5G ची भारतात किंमत

OnePlus 9 5G भारतात दोन प्रकारांमध्ये लाँच करण्यात आला होता, ज्यामध्ये ८जीबी रॅम सह १२८जीबी स्टोरेज आणि १२ जीबी रॅमसह २५६जीबी स्टोरेज आहे. फोनचा ८जीबी रॅम व्हेरिएंट ४९,९९९ रुपयांना आणि १२जीबी रॅम व्हेरिएंट ५४,९९९ रुपयांना लाँच करण्यात आला होता. मात्र आता या दोन्ही मोबाईलच्या किमतीत थेट १२ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे.

१२,००० रुपयांच्या कपातीनंतर, आता OnePlus 9 5G ८जीबी रॅम ३७,९९९ रुपयांना आणि OnePlus 9 5G १२जीबी रॅम ४२,९९९ रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून तसेच Croma Store वरून ऑनलाइन खरेदी करता येईल. त्याच वेळी, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ १७८९ रुपयेच्या मासिक EMI वर OnePlus 9 5G खरेदी करण्याचा पर्याय आहे.

( हे ही वाचा: २२६ रुपयांमध्ये मिळतोय Nokia 2660 Flip 4G मोबाईल; दोन डिस्प्लेसह मिळेल दीर्घकाळ बॅटरी बॅकअप)

OnePlus 9 5G तपशील

जर तुम्ही OnePlus 9 5G फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बघितले तर हा एक वर्ष जुना फोन आजही मजबूत आहे. या स्मार्टफोनमध्ये ६.५५ इंचाचा मोठा डिस्प्ले आहे, जो amoled पॅनेलवर तयार केला आहे आणि १२०Hz रिफ्रेश रेटवर काम करतो. हा एक पंच-होल डिस्प्ले आहे ज्यामध्ये स्क्रीन पूर्णपणे बेझललेस आहे आणि एक उत्कृष्ट दृश्य अनुभव देते.

OnePlus p 5G फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ चिपसेटवर सादर केला गेला आहे आणि तुम्हाला फोनमध्ये क्वाड कोर प्रोसेसर मिळेल जो २.८४GHz च्या कमाल क्लॉक स्पीडला सपोर्ट करतो. हा फोन १२ जीबी रॅम मेमरीला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये ४,५०० एमएएच बॅटरी आहे जी ६५वोल्ट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

( हे ही वाचा: Motorola ने लाँच केला कमी किमतीचा स्मार्टफोन Moto E22s; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स)

OnePlus 9 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. मुख्य कॅमेरा ४८ एमपीचा आहे जो हॅसल ब्लड टेक्नॉलॉजी सपोर्टसह येतो. त्याच वेळी, दुसरा सेन्सर ५० एमपीचा आहे जो वाइड अँगलला सपोर्ट करतो. फोनचा तिसरा सेन्सर २ एमपीचा असून तो मोनो कॅमेरा आहे. फ्रंट बद्दल बोलायचे झाले तर, तुम्हाला १६ एमपी सेल्फी कॅमेरा मिळत आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-09-2022 at 22:00 IST
ताज्या बातम्या