चिनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी असणाऱ्या OnePlus ने आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन ३ व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला आहे. हा फोन लवकरच जागतिक स्तरावर लॉन्च करण्यात येणार आहे. कंपनीने OnePlus Ace 2V हा स्मार्टफोन लॉन्च केला असून याचे फीचर्स , किंमत याबद्दल जाणून घेऊयात.

काय आहेत फीचर्स ?

OnePlus Ace 2V या स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना ६.७ इंचाचा डिस्प्ले वापरायला मिळणार आहे. तसेच या फोनच्या डिस्प्लेला १२०Hz चा रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. फोनमध्ये ट्रिप कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला असून, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि २ मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. सेल्फीसाठी वापरकर्त्यांना १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिन्यात आला आहे.

Vivo company New Smartphone T3x 5G launch in India on Know About design and price range of this upcoming model
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्टसह विवोचा ‘हा’ स्मार्टफोन होणार लाँच; किंमत फक्त…
Motorola launches Edge 50
बाकी कंपन्यांची उडाली झोप, मोटोरोलाचा जबरदस्त डिस्प्लेसह स्मार्टफोन देशात दाखल, मिळताहेत भरमसाठ ऑफर्स
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…
restaurant inside metro coach nmrc introduces unique metro coach restaurant at sector 137 station know seating capacity read all details
आता मेट्रोमध्ये करु शकता पार्टी अन् मीटिंग; ‘या’ ठिकाणी सुरू होतेय मेट्रो कोच रेस्टॉरंट

हेही वाचा : आनंदाची बातमी! BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस, ‘या’ राज्यापासून होणार सुरुवात

तसेच या स्मार्टफोनमध्ये ५०००mAh ची बॅटरी आहे. जी ८०W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच यामध्ये Mediatek Dimensity 9000 चिपसेटचा प्रोसेसर येतो. या स्मार्टफोनचे फोटो टिपस्टर अभिषेक यादवने ट्विटरद्वारे शेअर केले आहेत.

काय आहे किंमत ?

OnePlus Ace 2V या स्मार्टफोनमध्ये चिनी कंपनी असणाऱ्या वनप्लसने १२/२५६, १६/२५६, १६/५१२ या व्हेरिएंट दिले आहेत. १२ जीबी रॅम असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ही २७,१४७ रुपये इतकी आहे. तसेच १६/१२८ जीबी च्या व्हेरिएंटची किंमत ही २९,४८६ रुपये आणि १६/५१२ जीबी व्हेरिएंटची किंमत ३३,०२४ रुपये इतकी आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हा स्मार्टफोन सध्या फक्त चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. लवकरच तो जागतिक स्तरावर लॉन्च केला जाणार आहे.