वनप्लसचा नवीन स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. वनप्लस 9RT भारतात वेगळ्या नावाने लॉन्च केला जाऊ शकतो, अशी माहिती एका टिपस्टरने दिली आहे. कंपनीने चीनमध्ये डिव्हाइस लाँच केल्यानंतर एक महिन्यापेक्षा जास्त अवधी झाला आहे. मात्र अद्यापही कंपनीने भारतातील स्मार्टफोनची घोषणा केली नाही. त्यामुळे मोबाईलप्रेमींमध्ये उत्सुकता ताणली आहे. वनप्लस 9RT मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ चिपसेटसह आहे. तसेच ५० मेगापिक्सेलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे.

टिपस्टर मुकुल शर्माच्या मते, वनप्लस 9RT गुगल सपोर्टेड डिव्हाइस आणि Google Play लिस्टिंगमध्ये दिसले आहेत. मात्र डिव्हाइसला तेच नाव नाही, जे ऑक्टोबरमध्ये चीनमध्ये लॉन्च केले गेले होते. त्याऐवजी, कंपनीला फोन भारतात वनप्लस RT म्हणून लॉन्च करण्याची सूचना देण्यात आली आहे. “या मॉडेल बिल्डला पहिले BIS प्रमाणपत्र मिळाले आहे.”, असं ट्वीट शर्मा यांनी ट्विट केले आहे. हा मोबाईल आधी नोव्हेंबरमध्ये देशात लॉन्च होण्याची अपेक्षा होती. दुसरीकडे, वनप्लसने भारतात OnePlus 9RT किंवा OnePlus RT लॉन्च करण्याशी संबंधित कोणत्याही घोषणा केलेली नाही.

वनप्लस 9RT ५ एनएम क्वालकॉम स्नॅपड्रॅगनसह ८८८ चिपसेटद्वारे चालतो, १२ जीबीपर्यंत रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज आहे. डिव्हाइस १२० Hz रिफ्रेश रेट (६०० Hz टच सॅम्पलिंग रेट) आणि या कमाल ब्राइटनेस १३०० निट्स आहे. फोनमध्ये ४५०० mAh बॅटरी आहे जी ६५ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोन वायफाय ६, ब्लूटूथ ५.२ आणि एनएफसी 5G कनेक्टिव्हिटीसह येतो. मोबाईलमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर , १६-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल आणि २-मेगापिक्सलचा मॅक्रो असलेल्या ट्रिपल कॅमेरा सेटअपसह सुसज्ज आहे. कंपनीच्या मते, OnePlus 9RT चा प्रायमरी सेन्सर ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) आणि इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशन (EIS) या दोन्हीला सपोर्ट करतो. हँडसेटच्या पुढील बाजूस १६ मेगापिक्सेलचा होल-पंच सेल्फी कॅमेरा आहे, जो डिस्प्लेच्या वरच्या डाव्या कोपर्‍यात स्थित आहे.