सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे. हे माध्यम असे आहे की तुम्ही जे त्याला विचारलेत त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीरून तो आपल्याला उत्तर देईल. यामुळे तुम्हाला कमीत कमी वेळा तुम्हाला हवी असलेली माहिती मिळते. आणि ते शोधण्यासाठी तुम्हाला दुसरीकडे जावे लागत नाही. ChatGPT हे टूल OpenAI ने विकसित केले आहे.

सध्याला ChatGpt हे AI बेस चॅटबॉट आहे. मात्र तज्ञ मंडळी यांच्याकडे गुगलचा किलर म्हणून पाहत आहेत. हे माध्यम भविष्यात नक्की काय करणार याचा आत्ता आपण फक्त अंदाज बांधू शकतो. दूसरे आपण काहीच करू शकत नाही. पण हे माध्यम तुम्हाला पैसे वाचवण्यात मदत करू शकतो. आता आपण हे माध्यम पैसे वाचवण्यात कसे मदत करते ते पाहुयात.

Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
byju s shuts 30 out of 292 tuition centres for cost cutting
बायजूच्या ३० शिकवणी केंद्रांना टाळे; खर्चात कपात करण्यासाठी कंपनीने उचलले पाऊल
Loksatta Lokrang Where did these insults on Holi originate and how did they develop
निमित्त: शिव्या-महापुराण

हेही वाचा : नेटकऱ्यांना गुगलनं विचारलं नव वर्षात सर्वात आधी काय सर्च कराल? ‘ही’ भन्नाट उत्तरे ऐकून तुमचेही हसू आवरणार नाही

ChatGpt हे AI टूल आगामी काळात तुमचे पैसे वाचवण्यातही मदत करू शकते. हे कसे होणार हा प्रश्न तुमच्या मनात असेल. ChatGPT वर आधारित चॅटबॉट तुम्हाला पैसे वाचवण्यास मदत करू शकतो. DoNotPay चे सीईओ म्हणाले की, त्यांची कंपनी एका क्रोम एक्सटेंशन वर काम करत आहे. ज्यावर काम सुरु आहे ते एक्सटेंशन लोकांचे इंटरनेटचे बिल, रुग्णालयाचे खर्च आणि अन्य खर्च कमी करू शकतो किंवा वाचवू शकते.