New AI model 100 times more powerful than GPT-4 : गेल्या वर्षभरात चॅट जीपीटीबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. चॅट जीपीटी हे आर्टिफिशियल इंटेलिजेंस टूल आहे. हे एक जनरेटिव प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर भाषा मॉडेल असून एआयने विकसित केलं आहे. म्हणजेच गूगलसारखं एक दुसरं पोर्टल आहे असं म्हणायला हरकत नाही. पण, आता चॅट जीपीटी एक पाऊल पुढे जाणार आहे. कारण चॅट जीपीटी-४ पेक्षा १०० पट पॉवरफूल असणारे एक मॉडेल लवकरच येणार आहे. ओपन एआयचे सीईओ ताडाओ नागासाकी यांनी KDDI समिट २०२४ ( KDDI Summit 2024) मध्ये काही थक्क करणारे खुलासे केले आहेत. यामध्ये एक खुलासा असा होता की, जीपीटी-४ पेक्षा १०० पट अधिक पॉवरफूल असणारे एक मॉडेल लवकरच येणार आहे; ज्याचे नाव जीपीटी-नेक्स्ट असे आहे. अहवालानुसार हे जीपीटी-नेक्स्ट मॉडेल OpenAI च्या रहस्यमय प्रोजेक्ट 'स्ट्रॉबेरी'ची एक छोटी आवृत्ती वापरणार आहे. GPT-Next च्या पर्फोर्मन्समध्ये कॉम्प्युटर रिसोर्सेसमुळे नाही तर आर्किटेक्चरमुळे वाढ होणार आहे. जीपीटी-नेक्स्ट म्हणजे काय ? KDDI समिट २०२४ मध्ये , सीईओने ओपन एआयच्या कम्युनिकेशन्स व एआयबद्दल सांगितले आहे. त्यांनी एआय पॉवरहाऊसच्या व्यवसायाची रूपरेषा सांगितली आणि भविष्यात घोषित होणाऱ्या नवीन AI मॉडेलबद्दल त्यांचे मतसुद्धा मांडले. त्यांच्या मते या मॉडेललाच जीपीटी-नेक्स्ट म्हणतात. हेही वाचा…iPhone 16 Pro Max vs iPhone 15 Pro Max: आयफोन १६ साठी खर्च करणे किती फायद्याचे? पाहा ‘हे’ चार फीचर्स इव्हेंटमध्ये नागासाकीने पुढे सांगितले की, ऑगस्टच्या अखेरीस चॅट जीपीटी वापरणाऱ्या युजर्सच्या संख्येने २०० दशलक्ष हा आकडा ओलांडला आहे. त्यामुळे एकाचवेळी १०० ते २०० दशलक्ष युजर्सपर्यंत पोचणारा हा इतिहासातील सर्वात वेगवान सॉफ्टवेअर ठरला आहे. युजर्सना AI वापरण्यास सोपा मार्ग देणारे याआधी असे कोणतेही सॉफ्टवेअर नव्हते. पण, आता चॅट जीपीटीचा वापर करणाऱ्या कंपन्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे, म्हणूनच आणखीन एक नवे मॉडेल सादर होणार आहे. आतापर्यंत OpenAI चे जगभरात सुमारे दोन हजार कर्मचारी आहेत. त्यापैकी निम्मे AI डेव्हलप करण्यासाठी गुंतलेले आहेत. जपान व्यतिरिक्त, OpenAI चा US आणि UK मध्ये बेस आहेत. ओपन एआयचा आशियातील पहिला बेस म्हणून जपानची निवड करण्यात आली आहे. कारण जपान इतिहास, नवीन तंत्रज्ञानाचा पाठपुरावा करण्यास उत्सुक आहे. आपल्या भाषणात त्यांनी AI मॉडेल ‘GPT सीरिज’च्या भविष्याविषयीदेखील सांगितले, ज्याची तुलना त्यांनी GPT-3 आणि GPT-4 शी केली. ते म्हणाले की, पारंपरिक सॉफ्टवेअरच्या तुलनेत, एआय तंत्रज्ञान वेगाने वाढत आहे आणि या कारणास्तव ओपन एआयला लवकरात लवकर एआयसह जगाच्या निर्मितीला पाठिंबा द्यायला सुरुवात करणार आहे.