scorecardresearch

Premium

मेसेजला रिप्लाय द्यायचा कंटाळा आलाय? आता काळजी सोडा; ChatGpt करणार WhatsApp वर रिप्लाय, कसं? वाचा…

सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे.

ChatGpt reply WhatsApp mesaages
ChatGpt And WhatsApp – लोकसत्ता ग्राफिक्स टीम

व्हाट्सअ‍ॅप मीडिया प्लॅटफॉर्म आहे. हे मेटाच्या मालकीचे आहे. यावरून तुम्ही एकमेकांशी संवाद साधू शकता. एकमेकांना फोन करू शकता , आपले फोटोज स्टेटसला पोस्ट करू शकता. मात्र कधी कधी दिवसभराच्या कामांमुळे तुम्ही थकलेले असता आणि तुमच्या व्हाट्सअ‍ॅपवर भरपूर मेसेज आलेले असतात पण थकल्यामुळे तुम्हाला त्याचा रिप्लाय देण्याची इच्छा नसते. आता तुम्हाला हे करण्याची गरज पडणार नाही करणं आता तुमचे रिप्लाय देण्याचे काम हे ChatGpt करणार आहे.

OpenAI चा ChatGpt हा chatbot आता व्हाट्सअ‍ॅपचे रिप्लाय देण्यास मदत करणार आहे. तुम्ही आता Github द्वारे चॅटजीपीटीला व्हाट्सअ‍ॅपसह एकत्रित करू शकता. सोप्या भाषेत सजून घ्यायचे झाले तर तुम्ही चॅटबॉट ला Github च्या माध्यमातून व्हाट्सअ‍ॅपमध्ये आणू शकता.

MOFA Act
‘मोफा’ कायद्याचे अस्तित्व नाकारण्याचा न्याय व विधि विभागाचा प्रयत्न फोल!
Stressed Out Is your gut trying to tell you something
तुमच्या तणावाचा आतड्याच्या आरोग्यावर होतो परिणाम? संशोधनाबाबत काय आहे डॉक्टरांचे मत…
sushil kumar modi praise modi government for Popular announcements in interim budget
पहिली बाजू : लोकानुनय नव्हे; देशाची उभारणी!
a 45-year-old cyclist Anil Kadsur dies of heart attack
प्रसिद्ध सायकलपटूचे वयाच्या ४५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन; तीव्र प्रकारच्या व्यायामाचा हृदयावर कसा परिणाम होतो?

हेही वाचा : Tech Layoffs: Google ची नोकरी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याने मांडली व्यथा; म्हणाली, “माझ्या ६ वर्षाच्या मुलीला…”

सॉफ्टवेअर डेव्हलपर असलेल्या डॅनियल ग्रॉस याने पायथन स्क्रिप्ट (कोडिंग नोट ) तयार केली आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही व्हाट्सअ‍ॅपसह चॅटजीपीटी एकत्रित करू शकता. हे करण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा पहिल्यांदा वेबवरूनच सर्व आवश्यक भाषेच्या फाईल्स डाउनलोड करा. सर्व फाईल्स डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला WhatsApp-gpt-main हा फोल्ड ओपन करावा लागेल आणि server.py हे डॉक्युमेंट अ‍ॅक्टिव्हेट करावे लागेल. इथून चॅटजीपीटी आणि व्हाट्सअ‍ॅपचे एकत्रीकरण होईल. सर्व्हरसुरु झाल्यानंतर तुम्हाला IS असे टाईप करावे लागेल आणि एंटर करावे लागेल. यानंतर python server.py वर क्लिक करावे लागणार आहे. असे केल्यामुळे तुमचा मोबाईल नंबर OpenAI च्या चॅटपेजवर रजिस्टर होईल. यंततर तुम्ही हे कन्फर्म केले की, तुम्हाला GPT WhatsApp वर Open AI चे चॅट दिसेल.

जे लोक आपल्या कामामध्ये व्यस्त आहेत किंवा AI च्या संभाव्यतेमध्ये खोलवर जाऊ इच्छितात ते ही पद्धत वापरून पाहू शकतात. हा चॅटबॉट इतका सोपा आणि सामान्य प्रतिसाद देतो की समोरच्या व्यक्तीला हे कळणार नाही कि मेसेज तुम्ही केला आहे की AI ने. मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे इंटरनेटवर चॅट जीपीटीच्या नावाने अनेक प्रकारचे अ‍ॅप्लिकेशन्स, सॉफ्टवेअर, लिंक्स इत्यादी उपलब्ध आहेत. त्यामुळे डाउनलोड करताना त्याबद्दलचे सर्व तपशील खरे आहेत की नाहीत हे तपासून पाहणे आवश्यक आहे. ओपनआयने अद्याप कोणतेही चॅट जीपीटी अ‍ॅप जारी केलेले नाही किंवा मेटाने त्याच्या अ‍ॅप्समध्ये अशी कोणतीही सेवा कनेक्ट केलेली नाही.

हेही वाचा : Tech layoff: नोकर कपातीमध्ये Elon Musk यांच्या निष्ठावंताला देखील गमवावी लागली नोकरी, जाणून घ्या किती जणांची गेली नोकरी

सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे. हे माध्यम असे आहे की तुम्ही जे त्याला विचाराल त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीरून तो आपल्याला उत्तर देईल. सध्या ते इंग्रजी भाषेवर काम करते. हे भविष्यात इतर भाषांमध्ये जोडले जाऊ शकते. 

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Open ai tool chatgpt chatbot can reply your whatsapp messages tmb 01

First published on: 28-02-2023 at 09:10 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×