ओप्पोची नवीन स्मार्टफोन सिरीज Reno 7 भारतात लवकरच लॉन्च होणार आहे. मात्र कंपनीने ओप्पो Reno 7 सिरीजच्या लॉन्च तारखेबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. या सिरीज अंतर्गत, Oppo Reno 7 5G, Oppo Reno 7 Pro 5G आणि Oppo Reno 7SE 5G स्मार्टफोन गेल्या वर्षी चीनमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. मागील महिन्याच्या सुरुवातीला Oppo Reno 7 सिरीजची किंमत लीक झाली होती. Oppo Reno 7 सीरीजची रचना आयफोन १३ सीरीज सारखीच आहे. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइट आणि फ्लिपकार्टवर या नवीनतम मालिकेसाठी स्वतंत्र मायक्रोसाइट देखील तयार केली आहे. मायक्रोसाइटवरून अनेक फिचर्सची पुष्टी केली गेली आहे. आम्ही तुम्हाला पुष्टी केलेल्या फिचर्सची माहिती देणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओप्पो Reno 7 5G फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७७८ जी प्रोसेसर फोनमध्ये उपलब्ध असेल. मीडियाटेक डायमेनसिटी १२०० मॅक्स प्रोसेसर प्रो मॉडेलसह उपलब्ध असेल. ३२ मेगापिक्सेल सेन्सर असलेले जगातील पहिले फोन असेल. फोनमध्ये सोनी IMX766 (५० मेगापिक्सेल) असेल. ओप्पो Reno 7 5G मध्ये अँड्रॉइड ११ आधारित कलर ओएस १२ आहे. याशिवाय, यात ९० एचझेडच्या रीफ्रेश दरासह ६.४३ इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले आहे. १२ जीबीपर्यंत LPDDR4x रॅम आणि २५६ जीबीपर्यंत स्टोरेज आहे. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये प्राथमिक लेन्स ६४ मेगापिक्सेल आहे. दुसरी लेन्स ८ मेगापिक्सल्स वाइड अँगलची आहे आणि तिसरी लेन्स २ मेगापिक्सल्स मॅक्रो आहे. सेल्फीसाठी, Oppo Reno 7 5G मध्ये ३२-मेगापिक्सलचा Sony IMX709 सेंसर देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, यात ५ जी, ४ जी VoLTE, वायफाय ६, ब्लूटूथ व्ही ५.२, जीपीएस/ए- जीपीएस, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. यात ५०० एमएएच बॅटरी आहे जी ६० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

91mobiles च्या रिपोर्टवरून असे सांगण्यात आले होते की या Oppo मोबाईलची किंमत २८,००० ते ३१,००० रुपयांच्या दरम्यान असू शकते. प्रो व्हेरिएंट भारतात देखील सादर केला जाऊ शकतो, ज्याची किंमत ४१ हजार ते ४३ हजार रुपये असू शकते. मात्र, कंपनीकडून या किमतींची अद्याप पुष्टी झालेली नाही.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oppo reno 7 series india launch has been confirmed rmt
First published on: 20-01-2022 at 16:37 IST