अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि बिग बास्केटला टक्कर देण्यासाठी मुकेश अंबानी यांच्या कंपनी JioMart ने नवीन सेवा सुरू केली आहे. ज्यामध्ये तुम्ही व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून जिओ मार्ट वर ऑर्डर देऊ शकता. जिओ मार्टच्या या हालचालीमुळे रिटेल क्षेत्रात काम करणार्‍या अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि बिग बास्केट यांना कठीण स्पर्धा मिळेल. कारण आतापर्यंत या चार कंपन्या केवळ मोबाइल अॅप किंवा वेबसाइटवरूनच ऑर्डर घेत होत्या. पण जिओ मार्टच्या व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ऑर्डर घेण्याच्या सुरुवातीपासूनच अनेक ग्राहक फक्त जिओ मार्टला प्राधान्य देऊ शकतात.कारण भारतात इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचे वापरकर्ते मोठ्या संख्येने आहेत. चला जाणून घेऊया जिओ मार्टच्या या सेवेबद्दल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिओ मार्टने व्हॉट्सअॅप ऑर्डरवर डिलिव्हरी मोफत ठेवली आहे – जिओ मार्ट वापरकर्ते आता त्यांच्या किराणा यादीतील सर्व वस्तू व्हॉट्सअॅपद्वारे घरी बसून मिळवू शकतील. मिंटच्या अहवालात असे म्हटले आहे की कंपनीने जिओ मार्ट वापरकर्त्यांना त्यांच्या नोंदणीकृत नंबरवर उपलब्ध असलेल्या व्हॉट्सअॅप खात्यावर सूचना पाठवण्यास सुरुवात केली आहे.

( हे ही वाचा: TECNO SPARK 8 नवीन रॅम व्हेरिएंट भारतात लाँच, किंमत ११,००० रुपयांपेक्षाही कमी! )

९० सेकंदाचा ट्यूटोरियल व्हिडीओ आणि कॅटलॉग आहे. या निमंत्रणात या सेवेची सर्व माहिती युजर्सना देण्यात आली आहे. कंपनीने डिलिव्‍हरी शुल्‍क काही काळासाठी मोफत ठेवले आहे आणि चांगली गोष्ट अशी आहे की सामान ऑर्डर करण्‍यासाठी किमान ऑर्डर व्हॅल्यू नाही.

फेसबुक आणि रिलायन्समध्ये व्यावसायिक संबंध आहेत. व्हॉट्सअॅप ही फेसबुकच्या मालकीची कंपनी आहे. त्याच वेळी, फेसबुकने यापूर्वी रिलायन्सच्या जिओ प्लॅटफॉर्ममध्ये सुमारे 6 बिलियन डॉलरची गुंतवणूक केली होती. ज्याद्वारे फेसबुक जिओला त्याचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्यात पूर्णपणे मदत करत आहे. त्याचवेळी फेसबुक आणि रिलायन्सच्या या मोठ्या डीलचा दोन्ही कंपन्यांना मोठा फायदा होणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Order rations from whatsapp a service launched by jiomart a blow to amazon and flipkart ttg
First published on: 02-12-2021 at 16:21 IST