पॅन आधार लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ आहे. तुम्ही अद्याप तुमचा पॅन आणि आधार लिंक केले नसेल, तर आयकर विभाग तुमचे पॅन कार्ड रद्द करू शकते. यासोबतच दंडही होऊ शकतो. अशा परिस्थितीत आधार आणि पॅन कार्ड लिंकिंग लवकरात लवकर व्हायला हवे. आधार आणि पॅनमधील माहिती जुळत नसल्यामुळे अनेकांना लिंक करण्यात अडचणी येत आहेत. तुमच्याही बाबतीत असे होत असेल तर काळजी करण्याची गरज नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आधार-पॅनचे फायदे

आधार कार्डच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो. वन नेशन वन रेशन कार्ड असो की पीएम किसान सन्मान निधी किंवा अंत्योदय अन्न योजना, या सर्व योजनांचा लाभ लोकांपर्यंत फक्त आधार कार्डद्वारेच पोहोचला आहे. त्याचबरोबर बँक, पेन्शन, रेल्वेसह अन्य सरकारी खात्यांमध्येही आधार कार्डचा वापर ओळखपत्र म्हणून केला जात आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pan aadhaar link pan and aadhaar not being linked due to mismatch of information then follow this method scsm
First published on: 12-02-2022 at 12:20 IST