Paytm cancel protect scheme: भारतामध्ये लांबचा प्रवास करण्यासाठी ट्रेनचा वापर प्रामुख्याने केला जातो. भारतीय रेल्वे सुविधेद्वारे लोक नियमितपणे प्रवास करत असतात. तिकीट बुक करण्यासाठी ऑनलाइन पर्यायाची मदत घेणे फायदेशीर असते. असे केल्याने अधिक सुविधांचा लाभ देखील घेता येतो. ठराविक ठिकाणी जाण्यासाठी आपण तिकीट काढतो. पण काही कारणांमुळे तिकीट कॅन्सल करावे लागू शकते. अशा वेळी रेल्वे विभागाद्वारे रिफंड दिला जातो. तिकीट रद्द केल्यानंतर त्यावर पेनल्टी लागते. तिकीटाच्या एकूण रक्कमेतून पेनल्टीची रक्कम वजा होऊन उरलेले पैसे परत मिळतात. पण आता तिकीट कॅन्सल केल्यानंतर १०० टक्के रिफंड मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
पेटीएमने ग्राहकांसाठी एका नव्या योजनेबाबत घोषणा केली आहे. यामध्ये त्यांनी ट्रेन तिकीट रद्द केल्यावर ग्राहकांना १०० टक्के रिफंड मिळणार असल्याचा दावा केला आहे. कंपनीद्वारे दिल्या जाणाऱ्या ‘कॅन्सल प्रोटेक्ट’ (Cancel protect) या सुविधेअंतर्गत ग्राहकांनाफ्री कॅन्सिलेशनसह अन्य सेवाचादेखील लाभ घेता येणार आहे. परंतु यासाठी त्यांना पेटीएमतर्फ देण्यात आलेले नियम फॉलो करावे लागतील. चार्टिंग करण्यापूर्वी किंवा निर्गमनाच्या नियोजित वेळेच्या किमान ६ तास आधी तिकीट रद्द केल्यास ग्राहकांना त्यांचे संपूर्ण पैसे परत केले जातील. कॅन्सल प्रोटेक्टच्या मदतीने प्रवासी कधीही, कुठूनही नियमित आणि तत्काळमध्ये काढलेले तिकीट कॅन्सल करु शकतात.
आणखी वाचा – Jio Cricket Plan: आयपीएलआधी जिओने लॉन्च केले ‘हे’ तीन जबरदस्त प्लॅन्स, दररोज तीन जीबी डेटा आणि…
पेटीएमसह प्रवासी पेटीएम यूपीआयच्या मदतीने काढलेल्या ट्रेनच्या तिकीटावर पेनल्टी लागणार नसल्याची माहिती कंपनीने दिली आहे. या नव्या सुविधेमुळे ग्राहक तत्काळमध्ये ट्रेन तिकीट बुक करणे, ट्रेनची स्थिती पाहणे, प्लॅटफॉर्म क्रंमाक शोधणे, पेटीएमसह अन्य ऑनलाइन माध्यमांद्वारे काढलेल्या तिकीटांचा पीएनआर तपासू शकतात.