Paytm cashback on booking LPG cylinders : गॅस सिलेंडरचे भाव वाढले आहेत. मात्र तुम्ही पेटीएमच्या माध्यमातून गॅसबुक केल्यास तुमची बचत होऊ शकते. पेटीएम भारतगॅस, इंडेन आणि एचपी गॅसच्या बुकींवर युजर्सना मोठी कॅशबॅक ऑफर देत आहे. पेटीएम पहिल्या गॅस बुकिंगवर १५ रुपयांचा कॅशबॅक आणि पेटीएम वॉलेटद्वारे सिलेंडर बुक केल्यास ५० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देत आहे.

पेटीएमने मंगळवारी एलपीजी सिलेंडर बुक करणाऱ्या नवीन युजर्ससाठी धकमाकेदार कॅशबॅक ऑफरची घोषणा केली. नवीन युजर्स FIRSTGAS कोडचा वापर करून १५ रुपयांचा कॅशबॅक मिळवू शकतात. यासह पेटीएम वॉलेटद्वारे बुकींग करताना WALLET50GAS कोड वापरल्यास तुम्ही ५० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळवू शकता.

World Art Day Art and Income Source in Marathi
पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल; पण कलेशी केलेली मैत्री…आयुष्य समृद्ध करणाऱ्या कलेमुळे तुमच्या करिअरला मिळू शकते नवी दिशा
speech fasting benefits if you stay silent for an entire day this is what happens to your body
तुम्ही पूर्ण दिवस न बोलता शांत राहिल्यास शरीरात नेमके काय बदल होतात? जाणून घ्या ‘स्पीच फास्टिंग’चे फायदे
cabbage for weight loss
तुमच्या घरी कायम असणारी ‘ही’ भाजी वाढलेले वजन झपाट्याने करेल कमी; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय

(७ हजारांच्या आत मिळवा ‘हा’ ३२ इंच टीव्ही, अमेझॉनवर मिळत आहे मोठी सूट)

पेटीएम यूजर्सना नोंदणीकृत मोबाइल क्रमांक वापरून आणि अतिरिक्त शुल्क आकारून सोयीस्करपणे गॅस बुक करू देत आहे. वापरकर्ते अ‍ॅपमधील वैशिष्ट्यांद्वारे त्यांच्या बुकिंगचा मागोवा घेऊ शकतात. पहिल्या बुकिंगनंतर अ‍ॅप बुकिंग डिटेल्स सेव्ह करेल. याने युजरला दुसऱ्यांदा सिलेंडर बुकिंगसाठी १७ अंकी एलपीजी आयडी टाकण्याची गरज पडणार नाही. पेटीएमद्वारे एलपीजी गॅस सिलेंडर कसे बुक करायचे? जाणून घ्या.

  • पेटीएम अ‍ॅप उघडा आणि ‘रिचार्जेस आणि बिल पेमेंट कॅटेगरी’ अंतर्गत ‘बुक गॅस सिलिंडर’वर क्लिक करा.
  • आता एलपीजी सिलेंडर सर्व्हिस प्रोव्हाईडर सिलेक्ट करा आणि नंतर मोबाईल क्रमांक, १७ अंकी एलपीजी आयडी आणि ग्राहक क्रमांक टाका.
  • आता पेमेंट करून बुकिंग पूर्ण करा. तुमची बुकिंग पुष्टी होईल आणि तुमचा गॅस सिलिंडर तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर २ ते ३ दिवसांत जवळच्या गॅस एजन्सीद्वारे वितरित केला जाईल.