scorecardresearch

याच महिन्यात लॉंच होऊ शकतात Vivo V23 Pro, OnePlus 9RT, Xiaomi 11T Pro सारखे फोन, जाणून घ्या सविस्तर

याच महिन्यात लॉंच होऊ शकतात Vivo V23 Pro, OnePlus 9RT, Xiaomi 11T Pro सारखे फोन, जाणून घ्या सविस्तर

Upcoming-Smartphone-in-January-2
(फाइल फोटो)

नवीन वर्ष सुरू होताच अनेक नवीन स्मार्टफोन्स बाजारात दाखल झाले आहेत. या वर्षाबद्दल बोलायचे झाल्यास, अनेक नवीन स्मार्टफोन्स येण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये 5G चा देखील समावेश आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर थोडी वाट पाहू शकता. कारण या वर्षी जानेवारीमध्येच अनेक नवीन स्मार्टफोन्स येण्याची अपेक्षा आहे, चला यावर एक नजर टाकूया.

Vivo V23 Pro स्मार्टफोनबद्दल बोलायचं झालं तर त्यात 5G तंत्रज्ञान आसणार आहे. यात ६.५६ इंचाचा AMOLED FHD+ 90Hz डिस्प्ले आहे. सोबतच वक्र कडा आणि रुंद नॉच आहेत. यात ५० MP ड्युअल सेल्फी कॅमेरा आहे. स्मार्टफोनच्या मागील कॅमेरा सेटअपमध्ये ८ MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि २ MP मॅक्रो स्नॅपरसह जोडलेला १०८ MP फ्रंट कॅमेरा आहे. MediaTek Dimensity १२०० चिपसेट आणि ४,३०० mAh बॅटरीने देखील सुसज्ज असून जे ४४ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करत आहे.

आणखी वाचा : Micromax In Note 2 झाला लॉन्च, ४८ MP कॅमेर्‍यासह मिळतील हे फिचर्स

Xiaomi 11T Pro देखील या महिन्यात लॉन्च होऊ शकतो. १२० Hz रिफ्रेश रेट आणि १००० नीट्सची पीक ब्राइटनेससह ६.६७ इंचाचा AMOLED डिस्प्ले देखील मिळतोय. स्नॅपड्रॅगन ८८८ चिपसेट जे एकतर ८ GB किंवा १२ GB RAM सह जोडलेले आहे. डिव्हाइस १२८ GB आणि २५६ GB स्टोरेज व्हेरिएंटसह मिळतो. यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असून यामध्ये १०८ MP फ्रंट कॅमेरा, ८ MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि ५ MP टेलीमॅक्रो सेन्सरचा समावेश आहे. सेल्फीसाठी, तो १६ MP कॅमेरा सेटअप देत आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Phone gadget phones like vivo v23 pro oneplus 9rt xiaomi 11t pro can be launched in january prp

ताज्या बातम्या