शाओमीचा सब ब्रँड पोको आता POCO F4 5G च्या यशानंतर ‘POCO F5’ हा स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. POCO F5 स्मार्टफोन इंडियन सर्टिफिकेशन्स साइटवर लिस्ट झाला आहे, लवकरच POCO F5 भारतात लाँच होईल. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनच्या फीचर आणि सादरीकरणाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टमध्ये या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन लीक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये स्मार्टफोनच्या डिस्प्ले आणि प्रोसेसरबद्दल माहिती देण्यात आली आहे.

POCO F5 स्मार्टफोन IMEI database मध्ये स्पॉट करण्यात आला असून जिथे हा स्मार्टफोन २३०१३PC७५I मॉडेल नंबरसह लिस्ट झाला आहे. या मॉडेल नंबरमधील ‘२३’ हा फोन २०२३ मध्ये लॉन्च होईल, असे सूचित करतो.

आणखी वाचा : ठरलं! Redmi A1+ ‘या’ दिवशी भारतात लाँच होणार; जाणून घ्या स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स…

POCO F5 स्मार्टफोनची वैशिष्ट्ये
हा स्मार्टफोन २के अ‍ॅमोलेड डिस्प्लेवर लाँच केला जाईल जो १२०हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालेल. या फोनच्या स्क्रीन मध्ये १०००निट्स ब्राइटनेस दिली जाऊ शकते. तसेच लीकनुसार, या स्मार्टफोनमध्ये ८ प्लस Gen 1 SoC प्रोसेसर असेल जो या फोनला सुरळीत चालण्यास मदत करेल. तथापि, या स्मार्टफोनच्या उर्वरित तपशीलबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही.