Oppo आणि Poco या दोन लोकप्रिय मोबाइल उत्पादक कंपन्या आहेत. आपल्या ग्राहकांसाठी या दोन्ही कंपन्या नवनवीन स्मार्टफोन्स लॉन्च करत असतात. ज्यात कॅमेरा क्वालिटी, बॅटरी बॅकअप आणि डिस्प्ले व अन्य गोष्टी जास्तीत जास्त अपडेटेड देण्याचा प्रयत्न कंपन्या करत असतात. आज आपण Poco F5 5G आणि OPPO F23 5G या दोन फोनमधील तुलना जाणून घेणार आहोत. ज्यामुळे ग्राहकाला त्याच्या आवडीचा आणि त्याच्यासाठी आवश्यक सर्व गोष्टी असलेला स्मार्टफोन तो खरेदी करण्यास मदत मिळेल.

OPPO F23 5G चे फीचर्स

OPPO F23 5G या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ६.७२ इंचाचा फुल एचडी प्लस रिझोल्युशन असलेला एलसीडी डिस्प्ले मिळतो. तसेच फोटोग्राफीसाठी यामध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये ६४+२+२ मेगापिक्सल असे तीन कॅमेरे येतात. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा वापरकर्त्यांना यामध्ये मिळणार आहे. तसेच फोनला ५००० mAh ची बॅटरी आणि ६७W चा चार्जिंग सपोर्ट मिळतो.

हेही वाचा : OPPO ने लॉन्च केला ‘हा’ तगडा स्मार्टफोन; १६ जीबी रॅम, ६४ मेगापिक्सल कॅमेरासह मिळणार…

या फोनमध्ये तुम्हाला ८ जीबी रॅम मळणार आहे ती तुम्ही १६ जीबी पर्यंत वाढवू शकता. तसेच यात २५६ जीबी इतके इंटर्नल स्टोरेज देखील मिळते. हा स्मार्टफोन Android 13 वर आधारित ColorOS 13.1 वर काम करतो. ओप्पोने हा फोन केवळ ४४ मिनिटांमध्ये पूर्ण चार्ज होतो.

Poco F5 5G चे फीचर्स

Poco F5 5G या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ड्युअल सिम सपोर्ट मिळणार आहे. तसेच वापरकर्त्यांना यामध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी + AMOLED डिस्प्ले वापरायला मिळणार आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका असणार आहे. डिस्प्ले DCI-P3 कलर गॅमट, डॉल्बी व्हिजन आणि HDR10+ सपोर्टसह 100 टक्के कव्हरेजसह येतो. स्क्रीनवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ चे संरक्षण देखील देण्यात आले आहे.

हेही वाचा : VIDEO: Poco ने लॉन्च केला ४५ मिनिटांत चार्ज होणारा ‘हा’ तगडा स्मार्टफोन, किंमत फक्त…

Oppo F23 5G ची किंमत

Oppo F23 5G च्या ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ही २४,९९९ रुपये आहे. हा फोन तुम्ही Bold Gold आणि Cool Black या रंगांमध्ये खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन तुम्हाला खरेदी करायचा असल्यास कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर आणि ई -कॉमर्स साईट Amazon वर उपलब्ध आहे.

हेही वाचा : VIDEO: Motorola १ जून रोजी लॉन्च करणार ‘हा’ फोल्डिंग फोन, जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Poco F5 5G ची किंमत

Poco F5 5G हा स्मार्टफोन Charcoal Black, Electric Blue आणि Snow Storm White या रंगांमध्ये सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. २५६ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम असणाऱ्या फोनची किंमत ही २९,९९९ रुपये इतकी आहे. तर २५६/१२ जीबी स्टोरेज व रॅम असणाऱ्या फोनची किंमत ही ३३,९९९ रुपये इतकी आहे.