स्मार्टफोन सध्याच्या काळामध्ये प्रत्येकाची महत्वाची गरज बनला आहे. आपली अनेक काम स्मार्टफोनच्या मदतीने पूर्ण होत असतात. प्रत्येकजण आपापल्या गरजेनुसार आणि बजेटनुसार मोबाइल खरेदी करत असतो. काही जण कॅमेरा तर काही जण बॅटरी आणि परफॉर्मन्स आणि अन्य गोष्टी पाहून चांगला फोन खरेदी करतात. जर का तुम्ही असाच एखादा चांगल्या फीचर्सचा आणि योग्य बजेटमधील स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आपण १२ हजारांच्या आतमधील बेस्ट स्मार्टफोन्स पाहणार आहोत.

पोको M6 Pro 5G

शाओमी सब ब्रँड असलेल्या कंपनीने या ५ जी स्मार्टफोनला ६.७९ इंचाच्या FHD + डिस्प्लेसह लॉन्च केले आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा ९० Hz आहे. याच्या संरक्षणासाठी फोनमध्ये गोरिला ग्लास ३ लेयर मिळते. हा फोन Qualcomm Snapdragon 4 Gen 2 SoC ने सुसज्ज आहे. पोकोच्या या नवीन फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात ५० मेगापिक्सलचा AI सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हीडोसाठी यात ८मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला ५००० mAh क्षमतेच्या बॅटरीसह १८ W चार्जिंग सपोर्ट मिळतो. यूएसबी टाइप-सी केबलद्वारे याचे चार्जिंग होते. Poco M6 Pro 5G वर साइड-माउंट केलेले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. Poco M6 Pro 5G या फोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत १०,९९९ रुपये आहे.

Top recharge plans with OTT subscription
Reliance Jio vs Airtel vs Vodafone Idea: एकाच रिचार्जमध्ये दोन्ही गोष्टींचा लाभ; पाहा तिन्ही कंपन्यांचे ओटीटी सबस्क्रिप्शनचे प्लॅन्स
Let’s compare the Punch iCNG and the Exter CNG to determine which one offers more value
Tata Punch vs Hyundai Exter: बजेटमधील SUV निवडण्यात होतोय गोंधळ? टाटा पंच व ह्युंदाईचे फीचर्स, किंमत पाहा; कोणती बेस्ट ते ठरवा!
News About Cartoon Network
#RIPCartoonNetwork एक्सवर का चर्चेत आलाय हा ट्रेंड? कार्टून नेटवर्क खरंच बंद होणार?
Job Opportunity Opportunities in Central Arms Police Forces
नोकरीची संधी: सेंट्रल आर्म्स पोलीस फोर्सेसमधील संधी
Loksatta kutuhal Mark Zuckerberg Facebook founder and CEO of Meta Platforms Company
कुतूहल: मार्क झकरबर्ग
Stock Market: सेन्सेक्सची सर्वोच्च स्थानी झेप, ८० हजारांचा टप्पा पार; निफ्टीचीही विक्रमी घोडदौड!
case of fraud has been registered against four people including a doctor
मृत्यूचा बनाव रचून विमा कंपनीकडून उकळले ७० लाख रुपये; डॉक्टरसह चौघाजणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
job opportunities
नोकरीची संधी : बँक नोट पेपर मिल इंडिया प्रा.लि.मधील संधी

हेही वाचा : VIDEO: Poco कंपनीचा ५० मेगापिक्सलचा कॅमेरा असणारा ‘हा’ स्मार्टफोन भारतात लॉन्च, किंमत फक्त…

Infinix HOT 20 5G

Infinix कंपनीचा हा स्मार्टफोन १७ हजारांपेक्षा जास्त किंमतीमध्ये लॉन्च करण्यात आला होता. मात्र हा आता १२ हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. Infinix HOT २० ५ जी मध्ये ६.६ इंचाचा फुल एचडी प्लस IPS एलसीडी डिस्प्ले, तसेच त्यात १२० Hz इतका रिफ्रेश रेट मिळतो. यामध्ये ४ जीबी LPDDR4x रॅमसह १२८ जीबीचा सपोर्ट मिळतो. यामधील रॅम व्हर्च्युअल ७ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते.

यामध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, २ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आणि सेल्फी व व्हिडिओसाठी २ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. तसेच कंपनीने आपल्या वापरकर्त्यांसाठी या फोनमध्ये ५००० mAh क्षमतेची बॅटरी आणि त्याला १८W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो.

Lava Blaze 5G

भारतीय कंपनी असणाऱ्या LAVA कंपनीने आपला सर्वात स्वस्त ५जी स्मार्टफोन Lava Blaze 5G चे नवीन मॉडेल लॉन्च केले आहे. Lava Blaze 5G या नवीन लॉन्च झालेल्या स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना ६.५१ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले मिळणार आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन हे ७२०x१६०० पिक्सल इतके आहे. यामध्ये अँड्रॉइड १२ सह MediaTek Dimensity 700 हा प्रोसेसर आहे. यामध्ये ६ जीबी रॅम आणि ३ जीबी व्हर्च्युअल रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज वापरकर्त्यांना मिळणार आहे. या फोनमध्ये Wideline L1 चा सुद्धा सपोर्ट आहे. म्हणजेच यावर तुम्ही Amazon Prime Video आणि Netflix चे HD व्हिडिओ पाहू शकणार आहात. या फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ११,९९९ रुपये आहे.

हेही वाचा : अतिशय कमी बजेटमध्ये मिळतोय Lava Blaze 5G स्मार्टफोन; रॅम, मेमरी, फिचर्स जाणून घ्या

Redmi 12 5g

रेडमी १२ ५जी स्मार्टफोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळते. फोनमध्ये ६.७९ इंचाचा FHD+ आणि ९० Hz एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. कॅमेऱ्याच्या बाबतीत ४जी आणि ५जी मॉडेल्समध्ये ५० मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो Redmi 12 5G च्या ४/१२८ जीबी व्हेरिएंटची किंमत १०,९९९ रुपये आहे. ६/१२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १२,४९९ रुपये आहे..