Poco ही एक लोकप्रिय मोबाइल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन मोबाइल फोन्स बाजारामध्ये लॉन्च करत असते. ज्यात ग्राहकांना अनेक नवीन फीचर्स आणि अपडेट्स मिळतील. काही कालावधी आधी पोकोने आपला Poco X5 Pro हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. सध्या या फोनवर ग्राहकांना डिस्काउंट मिळत आहे. तर तो डिस्काउंट कुठे आणि किती मिळत आहे ते आपण जाणून घेऊया. तसेच हा फोन का खरेदी करावी याची कारणे देखील पाहुयात.

ई-कॉमर्स वेबसाइट असलेल्या Flipkart वर पोको X5 Pro या स्मार्टफोनवर मोठा डिस्काउंट मिळत आहे. हा ५जी स्मार्टफोन भारतात २२,९९९ रुपयांच्या किंमतीमध्ये लॉन्च करण्यात आला होता. आता त्याची किंमत कमी होऊन १९,९९९ रुपये इतकी झाली आहे. म्हणजेच या फोनवर ग्राहकांना ३ हजारांचा डिस्काउंट मिळत आहे. या ऑफरचा कालावधी किती असणार आहे हे स्पष्ट झालेले नाही. मात्र हे डिव्हाइस ग्राहकांसाठी एका आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध आहे. हा फोन का खरेदी करावा याची कारणे जाणून घेऊयात. याबाबतचे वृत्त India Today ने दिले आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा : iPhone 15 Series: भारतात आयफोनचे प्रो मॉडेल्स नॉन प्रो पेक्षा महागडे का असतात? जाणून घ्या

पोको X5 Pro खरेदी करण्याची ४ कारणे

पोको एक्स ५ प्रो मध्ये ६.७ इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळतो. जो किंमतीच्या तुलनेत अतिशय चांगला आहे. याचा डिस्प्ले फुल एचडी + रिझोल्युशन पॅनलवर काम करते. पोको फोनच्या डिस्प्लेवर वापरकर्त्यांना कॉर्निंग गोरिला ग्लास ५ चे कोटिंग देण्यात आले आहे. डिव्हाइसमध्ये डॉल्बी व्हिजनचा सपोर्ट आणि डिस्प्लेला १२० Hz इतका रिफ्रेश रेट मिळतो.

पोकोच्या या डिव्हाइसमध्ये ७७८ जी प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे या फोनमध्ये वापरकर्त्यांना फास्ट परफॉर्मन्स मिळतो. महत्वाचे म्हणजे कोणताही स्मार्टफोन ब्रँड या चिपसेटचा सपोर्ट २० हजारांपेक्षा कमी किंमतीच्या फोनमध्ये देत नाही. हे जास्त करून २५ ते ४० हजारांच्या फोनमध्ये बघायला मिळते.

हेही वाचा : Poco X5 Pro, Redmi Note 12 Pro आणि Realme 10 Pro Plus कोणता आहे बेस्ट स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

पोको एक्स ५ प्रो ५जी स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना ५००० mAh क्षमतेची बॅटरी मिळते. या फोनमधील बॅटरी लाइफ चांगली आहे. बॅटरी लाइफ चांगली असल्यामुळे हा फोन दिवसामधून एकदाच चार्ज करावा लागतो. ज्यामध्ये कॉलिंग, मेसेजिंग आणि बिनज वॉचिंगसाठी बॅटरी वापरली जाते. कंपनी रिटेल बॉक्समध्ये ६७ W चा फास्ट चार्जर देते. केवळ १५ मिनिटांमध्ये हा फोन ५० टक्के चार्ज होतो.

तुम्ही या फोनच्या कॅमेऱ्यातून इन्स्टाग्रावर पोस्ट करण्यासाठी चांगल्या क्वालिटीचे फोटो काढू शकता. मागील बाजूस ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये १०८ मेगापिल्क्सचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय यामध्ये ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा मिळतो. यामधून तुम्ही ४ के व्हिडीओ शूटिंग देखील करू शकता.

Story img Loader