scorecardresearch

जबरदस्त फीचर्ससह आज लाँच होणार Poco X5 Pro 5G स्मार्टफोन; मिळणार ‘हा’ प्रोसेसर

Poco X5 Pro ला Redmi Note 12 Pro+ प्रमाणेच फीचर्स असण्याची शक्यता आहे.

Poco X5 Pro Review
POCO X5 Pro 5G – संग्रहित छायाचित्र / द इंडियन एक्सप्रेस

Poco X5 Pro: POCO ही मोबाईल उत्पादक कंपनी आहे. पोको कंपनी आपले नवीन ५जी स्मार्टफोन भारतात लाँच करण्यासाठी सज्ज आहे. Poco चे आज भारतात दोन स्मार्टफोन्स लाँच होणार आहेत. कंपनी आज Poco X5 ही सिरीज लाँच करणार आहे. Poco X5 आणि Poco X5 Pro असे दोन स्मार्टफोन लाँच होणार आहेत. हे लाँचिंग आज संध्याकाळी भारतीय वेळेनुसार ५.३० वाजता होणार आहे. एका रिपोर्टच्या दाव्यानुसार Poco X5 Pro हा Redmi Note 12 Pro स्पीड एडिशनच्या रीब्रँडेड रूपात लाँच केला जाणार आहे.

POCO X5 Pro 5G चे फीचर्स

Poco X5 Pro ला Redmi Note 12 Pro+ प्रमाणेच फीचर्स असण्याची शक्यता आहे. ६.६७ इंचाचा AMOLED डिस्प्ले यामध्ये असू शकतो. या स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा , १०८ मेगापिक्सल रियर कॅमेरा असू शकतो. हँडसेटमध्ये Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसर दिला जाईल. तसेच ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज कंपनीकडून वापरकर्त्यांना दिले जाऊ शकते. या डिव्हाइसमध्ये ५००० mAh क्षमतेची बॅटरी वाव ६७ वॅटचे चार्जिंग सपोर्ट मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच फोनमध्ये IR ब्लास्टर आणि ड्युअल स्टीरिओ स्पीकर मिळण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा : विशाल भारद्वाज यांनी iPhone मधून तयार केली शॉर्ट फिल्म, टीम कुक यांनी केलं कौतुक; म्हणाले…

POCO X5 Pro 5G ची किंमत

Poco X5 Pro हा फोन भारतात सुमारे २०,००० रुपयांमध्ये लाँच केला जाऊ शकतो. यामध्ये ६ जीबी रॅम मिळण्याची अपेक्षा आहे. तर ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत ही २२,९९९ रुपये असू शकते.

POCO X5 Pro 5G: लाइव्ह स्ट्रीमिंग कसे पाहाल ?

Poco X5 Pro 5G स्मार्टफोन भारतात ६ फेब्रुवारी (आज) २०२३ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता लाँच होणार आहे. हा इव्हेंट कंपनीच्या अधिकृत YouTube आणि सोशल मीडिया अकाउंटवर थेट प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 11:32 IST