Cheapest Prepaid Recharge Plans: भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आपल्या ग्राहकांसाठी एक अगदी फायद्याचा प्रीपेड प्लॅन घेऊन आले आहेत. बीएसएनएलच्या या नवीन प्लॅनमध्ये ग्राहकांना एका दिवशी तब्बल ५ जीबी डेटा व फ्री कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. बीएसएनएलचा हा प्लॅन एअरटेल आणि व्ही सारख्या कंपन्यांपेक्षा फारच स्वस्त दरात उपलब्ध असल्याने हा प्लॅन इतर कंपन्यांसाठी मोठा धक्का असणार आहे. ग्राहकांना मात्र या प्लॅनमुळे मोठा फायदा होऊ शकतो, विशेषतः वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना किंवा ऑनलाईन कॉन्टेन्ट पाहण्यासाठी मोबाइल वापरणाऱ्यांना इंटरनेट डेटा लवकर संपण्याची चिंता करावी लागणार नाही.
कसा असणार BSNL चा प्लॅन?
बीएसएनएलचा नवा प्लॅन हा अवघ्या ५९९ मध्ये उपलब्ध असणार आहे यात ८४ दिवसांची वैधता असेल. सर्व वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये दैनंदिन १०० एसएमएस व मोफत कॉलिंग सुविधा मिळणार आहे. यामध्ये प्रतिदिन ५ जीबी डेटा सह खास गोष्ट म्हणजे रात्री १२ ते सकाळी ५ पर्यंत वापरकर्त्यांना अनलिमिटेड मोफत डेटा वापरता येणार आहे. याशिवाय आपल्याला zing ऍप व फ्री कॉलरट्यून अशा सुविधा सुद्धा मिळणार आहे.




(Gmail Hacks: विना इंटरनेट सेकंदात पाठवा ई-मेल; मोबाईल किंवा लॅपटॉप मध्ये फक्त ‘हे’ एवढंच बदला)
बीएसएनएलच्या या प्लॅनची तुलना इतर नेटवर्कशी केल्यास तुम्हाला नेमका किती फायदा होतोय हे नीट लक्षात येईल. सध्या बाजारात याच किमतीत एअरटेल व व्हीचे ५९९ रुपयांचे प्लॅन उपलब्ध आहेत. व्हीच्या प्लॅन मध्ये ग्राहकांना ७० दिवसांच्या वैधतेसह दिवसाला केवळ १.५ जीबी डेटा तर एअरटेलच्या प्लॅनमध्ये केवळ २८ दिवसांच्या वैधतेसह दिवसाला ३ जीबी डेटा उपलब्ध करून देण्यात येतो.
(IND vs PAK LIVE: भारत-पाकिस्तान सामना बघताना Ads ची कटकट नकोय? ‘हे’ एक काम करून पहा)
खास बाब म्हणजे व्ही व एअरटेलच्या प्लॅन्समध्ये बीएसएनएल प्रमाणे रात्रीच्या मोफत अनलिमिटेड डेटाची काहीच तरतूद नाही. अतिरिक्त फायदे अधिक असले तरी मूळ नेटवर्क व डेटाच्या पुरवठ्यात बीएसएनएलचे प्लॅन्स अधिक फायदेशीर ठरू शकतात.