Premium

Qualimate Tablet : केवळ २७५ रुपयांमध्ये भन्नाट टॅब; इंटरनेट कनेक्शनशिवायही वापरता येणार

विशेष म्हणजे या टॅबलेटला फार कमी चार्जींग लागते.

Qualimate Tablet
हा टॅबलेट अ‍ॅमेझॉनच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे

टॅबलेट विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला नक्कीच या बातमीचा मथळा वाचून धक्का बसला असेल. पण खरोखरच एक टॅबलेट ३०० रुपयांहून कमी किंमतीला एका कंपनीने उपलब्ध करुन दिला आहे. या टॅबलेटची किंमत खरोखरच केवळ २७५ रुपये इतकी आहे. हा टॅबलेट अ‍ॅमेझॉनच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अर्थात हा खराखुरा टॅबलेट नसून क्वालमिटे कंपनीचा किंड्स राइटिंग पॅड स्लेट आहे. या टॅबला ८.५ इंचाचा एलसीडी डिस्प्ले आङे. हा खरं तर लहान मुलांसाठीचा खेळण्यातील टॅब आहे. या टॅबची लांबी १४.५ सेंटीमीटर असू नवजय १५६ ग्राम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामान्यपणे मुलांना मोबाईल पाहण्याची फार सवय असते. त्यामुळे ही सवय मोडण्यासाठी या टॅबचा वापर करता येईल. हा टॅब इंटरनेट शिवाय काम करतो. केवळ चार्जींगवर हा टॅब चालतो. हा टॅब मुलांच्या डोळ्यांच्या दृष्टीनेही सुरक्षित आहे. स्क्रीन प्रकाशित न होताही टॅब वापरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. टेक एक्सपर्ट असणाऱ्या बनवारी सिंह जादौन यांनी यांनी हा टॅब मुलांना फायद्याचा असल्याचं म्हटलं आङे. तसेच हा पर्यावरणपुरकही आहे. इलेक्ट्रॉनिक रायटिंग पॅड्स हे पर्यावरणासाठी हानिकारक असतात. मात्र या डिजीटल पाटीमुळे कागद, पेन्सिल आणि खोडरब्बरशिवाय मुलांना शिकता येणार आहे.

हा टॅबलेट मुलांचं मन रमवण्यासाठी कुठेही घेऊन जाता येईल. यामधून मोबाईच्या तुलनेत फार कमी प्रमाणात रेडिएशन बाहेर पडतात असा कंपनीचा दावा आहे. बराच वेळ वापरल्यानंतरही या टॅबचा डोळ्यांना त्रास होत नाही. या स्टेलसोबत स्मार्ट स्टाइलस देण्यात येत असल्याने याचा वापर करुन लिहिणे, चित्र काढणं फारच सोप्प आहे.

विशेष म्हणजे या टॅबलेटला फार कमी चार्जींग लागते. कंपनीच्या दाव्यानुसार एकदा चार्ज केल्यानंतर हा टॅबलेट किमान एक वर्ष चालू शकतो. ही बॅटरी बदलण्याचीही सुविधा आहे. यासाठी विशेष अशा चार्जिंग कनेक्शनची गरज लागत नाही.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Qualimate tablet this superb tablet will be available for only rs 275 will work without internet scsg

First published on: 17-08-2022 at 18:53 IST
Next Story
तुम्ही नवीन फोन घ्यायचा विचार करत आहात? तर थोडा वेळ थांबा! Realme, Redmi, Vivo चे ‘हे’ बजेट फोन ऑगस्टमध्ये होतील लाँच