चिनची कंपनी रियलमीने भारतात आपला नवीन एज एंटरटेनमेंट स्मार्टफोन लाँच केला आहे. हा नवीन मोबाईल फोन कंपनीच्या ‘सी’ सीरीजमध्ये जोडला गेला आहे जो ‘रियलमी सी ३३’ नावाने लाँच करण्यात आला आहे. ५० मेगापिक्सल कॅमेरा आणि ५,००० एमएएच बॅटरी सारख्या वैशिष्ट्यांसह लाँच केलेला, हा एक स्वस्त रियलमी स्मार्टफोन आहे, चला तर मग या मोबाईलशी संबंधित सर्व फीचर्स, किंमत, ऑफर आणि उपलब्धता संबंधित माहिती तपशीलवार जाणून घेऊया.

रियलमी सी ३३ स्मार्टफोनची वैशिष्ट्ये

TCS Announces 9 percent Rise, Q4 Net Profit, Rs 12 thousand 434 Crore, Declares Final Dividend, Rs 28 per Share, tata consultancy services, finance article, finance news, share market, stock market,
टीसीएसला १२,४३४ कोटींचा नफा; तिमाहीगणिक ९.१ टक्के वाढ
Vivo company New Smartphone T3x 5G launch in India on Know About design and price range of this upcoming model
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्टसह विवोचा ‘हा’ स्मार्टफोन होणार लाँच; किंमत फक्त…
Bharti Hexacom initial share sale from 3rd April
भारती हेक्साकॉमची ३ एप्रिलपासून प्रारंभिक समभाग विक्री
Loksatta viva A glamorous celebration of fashion Lakme Fashion Week Geo World Garden
लॅक्मे फॅशन वीकची सेलिब्रिटी मांदियाळी
  • रियलमी सी ३३ नवीन अँड्रॉइड १२ ओएस वर लाँच करण्यात आला आहे. ८७ ग्रॅम वजनाचा आणि ८.३ मिमी जाडीचा, हा फोन ग्राफिक्ससाठी मेल जी ५७ जीपीयू ला सपोर्ट करतो. रियलमी सी ३३ भारतात ३ जीबी रॅम आणि ४ जीबी रॅम मेमरीसह लाँच करण्यात आला आहे.
  • हा एक ड्युअल सिम फोन आहे जो ४जी एलटीईला सपोर्ट करतो. सुरक्षेसाठी हा फोन साइड फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये ५,००० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे, जी कंपनीच्या दाव्यानुसार ३७ दिवसांचा स्टँडबाय टाइम देण्यास सक्षम आहे.
  • या स्मार्टफोनची स्क्रीन एलसीडी पॅनेलवर तयार केली गेली आहे. फोनच्या मागील पॅनलवर, एलईडी फ्लॅशसह सुसज्ज F/१.८ अपर्चरसह ५०-मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर देण्यात आला आहे, जो F/२.८ अपर्चरसह ०.३-मेगापिक्सलच्या दुय्यम लेन्सच्या संयोजनात काम करतो. त्याच वेळी, रियलमी सी ३३ ५एमपी सेल्फी कॅमेराला सपोर्ट करतो.

Saregama Carvaan Mobile: २ हजारांखाली असेल पहिला फोन; इंटरनेटशिवाय वाजतील १५०० गाणी

रियलमी सी ३३ स्मार्टफोनची किंमत

रियलमी सी ३३ हा मोबाईल फोन भारतात दोन प्रकारांमध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनच्या पहिल्या वेरिएंटमध्ये ३ जीबी रॅम ३२ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे, ज्याची किंमत ८,९९९ रुपये आहे. त्याचप्रमाणे, रियलमी सी ३३ ४जीबी रॉम ६४ जीबी स्टोरेज भारतात ९,९९९ रुपयांच्या किमतीत सादर करण्यात आला आहे. पहिली विक्री १२ सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट वर सुरू होईल, विशेष म्हणजे, हा फोन बाउंडलेस सी डिझाइनसह सादर करण्यात आला आहे. सँडी गोल्ड, एक्वा ब्लू आणि नाईट-सी या तीन रंगांच्या पर्यायांसह हा फोन बाजारात दाखल करण्यात आला आहे.