Premium

Iphoneला टक्कर देण्यासाठी ‘ही’ कंपनी भारतात लॉन्च करणार नवा स्मार्टफोन; अनेक भन्नाट फीचर्स असूनही किंमत आहे फक्त…

जाणून घेऊयात आयफोनच्या फीचर्सना टक्कर देणाऱ्या नव्या स्मार्टफोनबद्दल…

realme launch - iphone
आयफोनला टक्कर देणारा स्मार्टफोन (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Realme C55 Launch: रीअलमी ही स्मार्टफोन व अन्य काही विद्युत उपकरणे तयार करणारी टेक कंपनी आहे. काही दिवसांपूर्वी या कंपनीने इंडोनेशियामध्ये Realme C55 हा त्यांचा नवा स्मार्टफोन लॉन्च केला. या स्मार्टफोनला तेथे मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला आहे. रीअलमीच्या या नव्या फोनमध्ये iPhone 14 Pro मध्ये असलेल्या Dynamic island या फीचरला टक्कर देणारे Mini Capsule हे फीचर जोडण्यात आले आहे. डिझाइनच्या बाबतीमध्ये हा स्मार्टफोन Realme 10 सारखा आहे असे म्हटले जात आहे. इंडोनेशिया व अन्य देशांमधील बाजारपेठांमध्ये उपलब्ध असलेला हा स्मार्टफोन लवकरच भारतामध्ये लॉन्च केला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Realme C55 मधील फीचर्स:

रीअलमीच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये ६.५२ इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे. त्यासह यात फुल एचडी+ रिफ्रेश रेट आणि ६८० निट्स ब्राइटनेस असे फीचर्स आहेत. ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट पॅनल असलेल्या या स्मार्टफोनला पातळ बेझल आहे. रीअलमी कंपनीच्या या श्रेणीतील अन्य स्मार्टफोन्समध्ये या अपडेटेड आढळत नाहीत. फोन वापरताना त्यातील मिनी कॅप्सूल फीचरमुळे आयफोनच्या डायनॅमिक आयलॅंड फीचरचा भास होतो. यामुळे नोटिफिकेशन टूल अ‍ॅक्सेस करताना अधिकची मदत होते.

या स्मार्टफोनमध्ये ८ जीबी IPDDR4X रॅम आणि २५६ जीबीपर्यंत Emmc ५.१ स्टोरेजसह पेअर केलेला ऑक्टा कोअर मीडियाटेक हेलिओ G88 प्रोसेसर उपलब्ध आहे. त्याव्यतिरिक्त या स्मार्टफोनची ५,००० एमएएच बॅटरीची क्षमता आहे आणि ३३ व्हॉल्टेज फास्ट चार्जिंग ऑप्शन देखील आहे. Realme C55 मध्ये फक्त ४ जी नेटवर्क सेवा वापरता येणार आहेत. तसेच बायोमेट्रिक्स आणि एनएफसीसाठी साइड माउंटेड फिंगर प्रिंट स्कॅनर या सुविधा देखील आहेत. यात ६४ मेगापिक्सल प्रायमरी शूटर आणि २ मेगापिक्सल इन-डेप्थ सेन्सर असलेला ड्युअल कॅमेरा या स्मार्टफोनला जोडलेला आहे. याचा फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सलचा आहे.

आणखी वाचा – Microsoft News: व्यवसायात भरभराट होण्यासाठी मायक्रोसॅाफ्टचे AI Tool करणार मदत; नक्की कसे ते जाणून घ्या

Realme C55 ची किंमत:

६ जीबी रॅम आणि ८ जीबी रॅम अशा दोन ऑप्शनमध्ये हा रीअलमीचा स्मार्टफोन बाजारामध्ये उपलब्ध आहे. इंडोनेशियामध्ये या स्मार्टफोनची किंमत भारतीय चलनानुसार १३,५०० ते १६,००० रुपये इतकी असल्याची माहिती समोर आली आहे. भारतामध्ये अधिकृतरित्या लॉन्च झाल्यानंतर याची भारतातील किंमती समोर येतील.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-03-2023 at 14:29 IST
Next Story
आनंदाची बातमी! BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस, ‘या’ राज्यापासून होणार सुरुवात