scorecardresearch

MWC 2023: Realme ने लॉन्च केला केवळ ४ मिनिटांत ५० टक्के चार्ज होणारा जगातील पहिला स्मार्टफोन; जबरदस्त फीचर्ससोबत मिळणार ‘ही’ सुविधा

Realme GT3 Launch at MWC 2023: Realme ने या फोनमध्ये स्टेनलेस स्टील व्हेपर कूलिंग सिस्टीम दिली आहे.

Realme GT3 Launch at MWC 2023
रिअलमी जीटी ३ स्मार्टफोन – संग्रहित छायाचित्र / द इंडियन एक्सप्रेस

MWC 2023, Realme GT3 Launch in India: Realme कंपनीने सर्वात फास्ट स्मार्टफोन असलेला Realme GT 3 हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन या वर्षातील सर्वात मोठा शो असलेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस या शो मध्ये लॉन्च केला आहे. इतके फास्ट चार्जिंग सपोर्ट असणारा हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे. Realme GT 3 यामध्ये काही प्रीमियम फीचर्स देखील देण्यात आली आहेत.

Realme GT 3 चे स्पेसिफिकेशन्स

Realme GT 3 फोनच्या मागच्या बाजूला एक LED लाईट आहे जो Nothing Phone 1 या फोनप्रमाणेच आहे. मात्र रिअलमीच्या या फोनमध्ये एक एलईडी स्ट्रीप आहे. तसेच मागच्या पॅनलवर जास्त भाग व्यापणारा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. नोटिफिकेशन किंवा काही अलर्ट तुम्हाला येत असेल तेव्हा हा एलईडी लाईट ब्लिंक होतो. Realme GT 3 या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8+ Gen 1 हा प्रोसेसर आहे.

Realme ने या फोनमध्ये स्टेनलेस स्टील व्हेपर कूलिंग सिस्टीम दिली आहे. तसेच यामध्ये वापरकर्त्यांना Dolby Atmos सह ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स मिळणार असून इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळणार आहे.Realme GT 3 मध्ये १४४HZ हा रिफ्रेश रेटसह ६.७४ इंचाचा डिस्प्ले येतो. डिस्प्लेमध्ये १४०० निट्स पीक ब्राईटनेस देण्यात आला आहे. यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून त्यामध्ये ५० मेगापिक्सलचा सोनी IMX890 सेन्सर देण्यात आला आहे. तसेच कॅमेरामध्ये OIS चे ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन मिळते. या कॅमेरा सेटॅपमधील दुसरी लेन्स ही ८ मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अंगलची आणि ३ री लेन्स २ मेगापिक्सलची आहे.

हेही वाचा : MWC 2023: सॅमसंगच्या फोल्डेबल फोननंतर ‘या’ कंपनीने लॉन्च केला Rollable SmartPhone; डिस्प्लेमध्ये मिळणार जबरदस्त फिचर

जगातील फास्ट चार्जिंग होणारा स्मार्टफोन

Realme GT 3 मध्ये वापरकर्त्यांना ४६००mAh ची बॅटरी आणि त्याला २४०W चा चार्जिंग सपोर्ट मिळतो. या फोनची बॅटरी फक्त ४ मिनिटांत ५० टक्के चार्ज होतो असा कंपनीने दावा केला आहे. तसेच रिअलमी कंपनीचा असाही दावा आहे की या चार्जरने तुमची तुमचा ६५W चा लॅपटॉप देखील चार्ज करू शकता. मात्र हा फोन भारतात कधी लॉन्च होणार याबद्दल रिअलमी कंपनीने अधिकृतरीत्या काही स्पष्ट केलेले नाही आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-03-2023 at 15:57 IST
ताज्या बातम्या