Realme कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने आपला Narzo N53 हा स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. Realme Narzo N53 हा कंपनीचा सर्वात स्लिम फोन असल्याचे कंपनीचा दावा आहे. रिअलमीच्या या फोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनबद्दल जाणून घेऊयात.
Realme Narzo N53 चे फीचर्स
Realme Narzo N53 मध्ये तुम्हाला ६.७४ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा ९० Hz इतका आहे. ब्राईटनेस ४५० नीट्स इतका आहे. हा स्मार्टफोन Octa Core Unisoc T612 SoC वर काम करतो. या फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज मिळते. या फोनला ६ जीबी पर्यंत व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट मिळतो. रिअलमीचा हा स्मार्टफोन अँड्रॉइड १३ वर आधारित Realme UI 4.0 काम करतो. याबाबतचे वृत्त gadgets360 ने दिले आहे.
हेही वाचा : VIDEO: Motorola १ जून रोजी लॉन्च करणार ‘हा’ फोल्डिंग फोन, जाणून घ्या
Realme Narzo N53 चा कॅमेरा
रिअलमीच्या या फोनमध्ये वापरकर्त्यांना ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यामध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो. ज्याला AI चा सपोर्ट देखील मिळतो. दुसऱ्या लेन्सबद्दल कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. सेल्फी आणि व्हिडिओसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. Realme Narzo N53 मध्ये ५०००mAh ची बॅटरी मिळते. ज्याला ३३ W चे SuperVOOC फास्ट चार्जिंग मिळते. हा फोन ३० मिनिटांमध्ये ० ते ५० टक्के चार्ज होऊ शकतो असा कंपनीचा दावा आहे. सेफ्टीसाठी यामध्ये साईट माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे. फोनचे एकूण वजन १८२ ग्रॅम आहे. फोनमध्ये ड्युअल बँड वायफाय आणि ब्लूटूथ ५.० मिळते.
Realme Narzo N53 ची किंमत
Realme Narzo N53 च्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ८,९९९ रुपये आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत १०,९९९ रुपये आहे. ग्राहकांना हा रिअलमीचाही फोन खरेदी करताना HDFC बँकेच्या कार्डने व्यवहार केल्यास अतिरिक्त १,००० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.
रिअलमीच्या या फोनची विक्री ४ मे पासून सुरु होणार आहे. हा फोन रिअलमी ऑनलाईन स्टोअर आणि ई-कॉमर्स वेबसाईट Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. पहिल्या सेलमध्ये ६४ जीबीच्या व्हेरिएंटवर ५०० रुपये आणि १२८ जीबी स्टोरेजच्या फोनवर १ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. हा फोन तुम्ही Feather Black आणि Feather Gold या रंगांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.