Realme: बजेट फोननंतर आता कंपनीची अल्ट्रा प्रीमियम फोनसाठी तयारी; i-Phone ला देणार टक्कर

रियलमी कंपनीने स्वस्त आणि मध्यम श्रेणीतील स्मार्टफोन लॉन्च केल्यानंतर आता प्रिमियम सेंगमेंटकडे मोर्चा वळवला आहे.

Realme_Phone
Realme: बजेट फोननंतर आता कंपनीची अल्ट्रा प्रीमियम फोनसाठी तयारी; i-Phone ला देणार टक्कर

रियलमी कंपनीने स्वस्त आणि मध्यम श्रेणीतील स्मार्टफोन लॉन्च केल्यानंतर आता प्रिमियम सेंगमेंटकडे मोर्चा वळवला आहे. कंपनी येत्या काही दिवसात ६० हजार रुपयांपर्यंतचा फोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे संस्थापक आणि सीईओ यांनी ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली आहे. कंपनीने OnePlus, Vivo, Oppo, IQ आणि अधिक यांसारख्या इतर ब्रँडशी स्पर्धा करण्यासाठी जीटी सिरिज सुरु केली आहे. आता कंपनी सॅमसंग, आयफोन आणि पिक्सेल स्मार्टफोनला टक्कर देण्याासाठी तयारी करत आहे.

रियलमीच्या नव्या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८९८ चिपसेट असण्याची शक्यता आहे. शिवाय, कंपनी १२५ W मोबाईल वेगाने चार्ज करण्याची सुविधा देऊ शकते. या व्यतिरिक्त हाय कॅमेरा मॉड्यूल, अल्ट्रा वाइड अँगल आणि टेलीफोटो लेंस स्मार्टफोन लावण्याची तयारी करत आहे. रियलमीचे संस्थापक स्काय ली यांनी स्मार्टफोन कधी लॉन्च होईल, याबाबतची माहिती दिलेली नाही. मात्र २०२२ हा स्मार्टफोन लॉन्च होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र अजूनही नवा अल्ट्रा प्रीमियम स्मार्टफोन कधी मिळणार याबाबत माहिती नाही.

दुसरीकडे, कंपनी भारतात आपलं जाळं पसरवण्यावर काम करत आहे. कंपनीने देशात आता २०० एक्सक्लूसिव स्टोर खोलले आहेत. १३ नोव्हेंबर २०२१ पासून सर्व स्टोर्स सुरु आहेत. “रियलमीचे स्टोर्स जाळं घट्ट विणण्यास मदत करेल. आम्ही आमच्या ग्राहकांना चांगलं उत्पादन देण्याचं प्रयत्न करत आहोत.”, असं रियलमी इंडियाचे सीईओ माधव शेठ यांनी सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Realme launch premium smartphone upcoming year rmt

ताज्या बातम्या