scorecardresearch

१२०W फास्ट चार्जिंगसह सज्ज रेडमीचा नवीन स्मार्टफोन लॉंच, मिळेल १०८ मेगापिक्सेल कॅमेरा, जाणून घ्या किंमत आणि स्‍पेसिफिकेशन

शाओमीने या वर्षाच्या सुरुवातीला त्यांचा रेडमी के ५० गेमिंग स्मार्टफोन लॉंच केला होता. आता कंपनीने या सिरिजमध्ये व्हॅनिला रेडमी के ५० आणि रेडमी के ५० -प्रो सादर केले आहेत.

या दोन्ही स्मार्टफोन तुम्हाला ब्लॅक, ग्रीन, सिल्व्हर आणि ब्लू असे चार कलर पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत. (photo credit: Xiaomi/ jansatta)

शाओमीने या वर्षाच्या सुरुवातीला त्यांचा रेडमी के ५० गेमिंग स्मार्टफोन लॉंच केला होता. आता कंपनीने या सिरिजमध्ये व्हॅनिला रेडमी के ५० आणि रेडमी के ५० -प्रो सादर केले आहेत. दोन्ही नवीन उपकरणे समान बॉडी डिझाइनसह येतात. रेडमी के ५० प्रो मध्ये १०८ MP कॅमेरा, १२० W फास्ट चार्जिंग सपोर्ट तसेच मजबूत बॅटरी लाईफ देण्यात आली आहे. यामध्ये प्रथमच अनेक गोष्टी दिल्या जात आहेत. कोणत्या आहेत त्या जाणून घेऊयात.

रेडमी के ५०, रेडमी के ५० प्रो ची किंमत

या दोन्ही स्मार्टफोन तुम्हाला ब्लॅक, ग्रीन, सिल्व्हर आणि ब्लू असे चार कलर पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच ८ जिबी रॅम / १२८ जिबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असलेला रेडमी के ५० ची किंमत अंदाजे २८,६९२ रूपये आणि १२ जिबी रॅम / २५६ जिबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी अंदाजे ३३,४७६ रुपये आहे.

रेडमी के ५० प्रो ची किंमत ८जिबी रॅम / १२८ जिबी स्टोरेज व्हेरियंटसाठी अंदाजे ३५,८६३ रुपये इतकी आहे. तसेच ८ जिबी रॅम / २५६ जिबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी अंदाजे ३९,४५७ रुपये आहे.

रेडमी के ५० आणि रेडमी के ५० प्रोचे स्‍पेसिफिकेशन

रेडमी के ५० आणि रेडमी के ५० प्रो या दोन्ही स्मार्टफोनमध्ये ६.७-इंचाचा QHD AMOLED डिस्प्ले आहे ज्याचे रिझोल्यूशन ३२००×१४४० पिक्सेल आणि १२०Hz रिफ्रेश रेट आहे. डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस आहे. रेडमी के ५० MediaTek Dimensity ८१०० SoC द्वारे समर्थित आहे, तर Redmi K50 Pro MediaTek Dimensity 9000 SoC द्वारे समर्थित आहे. फोन थंड ठेवण्यासाठी दोन्ही उपकरण सात-लेयर व्हेपर चेंबर कूलिंग सिस्टमसह येतात.

१९ मिनिटांत होईल पूर्ण चार्ज

हे फोन कंपनीच्या MIUI १३ स्क्रीनसह अँड्रॉइड१२ ऑपरेटिंग सिस्टमद्वारे समर्थित करण्यात आले आहेत. व्हॅनिला के ५० मध्ये ५,५००mAh ची बॅटरी ६७W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, तर प्रो व्हेरियंटमध्ये लहान ५,०००mAh बॅटरी आहे, जी १२०W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की रेडमी के ५० प्रो १९ मिनिटांत १०० टक्के चार्ज होतो.

कॅमेरा

या दोन्ही फोनवर सेल्फीसाठी २०-मेगापिक्सलचा Sony IMX596 सेंसर देण्यात आला आहे. रेडमी के ५० मध्ये तिहेरी कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये OIS सह ४८MP प्राथमिक सेन्सर, ८MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि २MP मॅक्रो लेन्स देण्यात आले आहेत.जेएनएच प्राथमिक सेन्सर, ८MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि २MP मॅक्रो लेन्सचा समावेश करण्यात आलेला आहे.

पहिल्यांदा काय झाले

रेडमी के ५० मध्ये MediaTek Dimensity ८१०० SoC तर रेडमी के ५० प्रो मध्ये MediaTek डायमेंशन ९००० SoC दिले गेले आहे. त्याच वेळी, प्रो व्हेरियंटमध्ये १२०W फास्ट चार्जिंग फास्ट चार्जिंग सपोर्ट सादर करण्यात आला आहे. याशिवाय दोन्ही फोन थंड ठेवण्यासाठी सात-लेयर व्हेपर चेंबर सिस्टम देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Redmi k50 and redmi k50 pro launched with 108 mp camera 120w fast charging and many more scsm

ताज्या बातम्या