Xiaomi चे Redmi फोन परवडणाऱ्या किमतीत त्यांच्या मजबूत फीचर्ससाठी ओळखले जातात. या स्मार्टफोन्समध्ये उत्तम कॅमेरा, बॅटरी आणि डिस्प्ले फीचर्स आहेत. जर तुम्ही देखील नवीन Redmi फोन घेण्याचा विचार करत असाल तर एक चांगली संधी आहे. Redmi note 10 Pro फ्लिपकार्टवरून बँक, एक्सचेंज ऑफरमध्ये खरेदी करता येईल. आता Flipkart वरून Redmi Note 10 Pro खरेदी केल्यावर, तुम्हाला पार्टनर ऑफर अंतर्गत एक सरप्राईज कॅशबॅक कूपन मिळेल, जे यूजर बिग बिलियन डेज सेल २०२२ मध्ये वापरण्यास सक्षम असतील.

Redmi Note 10 Pro Price Offer
Redmi Note 10 Pro च्या ६ GB रॅम आणि १२८ GB इनबिल्ट स्टोरेज व्हेरिएंटची किंमत फ्लिपकार्टवर १५,९९९ रुपयांना लीस्ट केली आहे. हा Redmi स्मार्टफोन ICICI बँक क्रेडिट कार्ड नॉन-ईएमआय ट्रांजेक्शनद्वारे खरेदी केल्यास १००० रुपयांची झटपट सूट मिळेल. दुसरीकडे, ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड EMI ट्रांजेक्शनद्वारे हँडसेटच्या खरेदीवर १,२५० रुपयांची त्वरित सूट असेल. हा Redmi फोन डेबिट कार्ड ईएमआय १,००६ रुपये प्रति महिना वापरला जाऊ शकतो. याशिवाय एक्सचेंज ऑफर अंतर्गत स्मार्टफोनवर १२,५०० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

आणखी वाचा : सर्वात मोठा सेल! २३ जुलैपासून सुरू होतोय Flipkart Big Saving Days Sale, स्मार्टफोन्सवर बंपर ऑफर

Redmi Note 10 Pro Specifications
Redmi Note 10 Pro स्मार्टफोनमध्ये ६ GB रॅम आणि १२८ GB इनबिल्ट स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज ५१२ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंच फुलएचडी + सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. स्क्रीनचा रीफ्रेश दर १२० Hz आहे, आस्पेक्ट रेशो २०:९ आहे. Redmi च्या फोनला पॉवर देण्यासाठी ५०२० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हँडसेटमध्ये Qualcomm Snapdragon 732G प्रोसेसर आहे.

आणखी वाचा : २५,००० रूपयांमध्ये नवीन लॅपटॉप लॉंच, Infinix InBook X1 Neo मध्ये फास्ट चार्जिंगसह ‘हे’ आहेत फिचर्स…

Redmi Note 10 Pro मध्ये फोटो आणि व्हिडीओंसाठी ६४ मेगापिक्सेलचा प्रायमरी रियर कॅमेरा आहे. फोनमध्ये ८ मेगापिक्सल, ५ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सलचे आणखी तीन सेन्सर आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ५०२० mAh बॅटरी देखील आहे. हँडसेट Android 11 सह येतो.