चिनी कंपनी शाओमीने आपली लोकप्रिय स्मार्टफोन सिरीज नोट (Note) मध्ये रेडमी नोट ११ला एका कार्यक्रमादरम्यान जागतिक पातळीवर लॉंच केले आहे. या फोनला सर्वप्रथम चीनमध्ये लॉंच केले गेले. त्यानंतर लगेच भारतासोबत इतर अनेक देशांमध्ये हा स्मार्टफोन लॉंच करण्यात आला आहे. या सिरीजमध्ये रेडमी नोट ११ (Redmi Note 11), नोट ११एस (Note 11S), नोट ११ प्रो ४जी (Note 11 Pro 4G) आणि ५जी (5G) हे चार उत्कृष्ट स्मार्टफोन जगातील इतर प्रदेशात सादर करण्यात आले आहेत. या सर्व स्मार्टफोन्समध्ये फ्लॅट फ्रेम डिझाईन, ५०००एमएएच बॅटरी, मिड रेंज प्रोसेसर आणि एमओएलईडी (AMOLED) डिस्प्ले यांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेडमी नोट ११ (Redmi Note 11)

रेडमी नोट ११ (Redmi Note 11) बद्दल बोलायचं झाल्यास हा चारही स्मार्टफोन्समधील सर्वात स्वस्त फोन आहे. याची किंमत जवळपास १३,४०० रुपये आहे. या फोनमध्ये ५० मेगापिक्सेल क्वाड-कॅमेरा सेटअप आणि १३ मेगापिक्सेल सेल्फी शुटर कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये ६.४३ इंचाची एफएचडी + एमओएलईडी डिस्प्ले आणि एक क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६८० प्रोसेसर देण्यात आला आहे. यात ४जीबी रॅम आणि ६४जीबी स्टोरेजचा बेस व्हेरिएंट सादर करण्यात आला आहे. याशिवाय ४जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत जवळपास १४,९०० रुपये असेल.

Whatsapp New Feature : व्हॉट्सअ‍ॅप लवकरच लॉंच करणार नवे फीचर; अ‍ॅडमिनला मिळणार ‘हा’ विशेष अधिकार

रेडमी नोट ११एस (Redmi Note 11S)

यासोबतच रेडमी नोट ११एस (Redmi Note 11S) सुद्धा लॉंच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ९ फेब्रुवारीला भारतामध्ये उपलब्ध होईल. डिझाईनच्या बाबतीत या स्मार्टफोनचा लूक नोट ११प्रमाणेच आहे. चिपसेटची जागा मीडियाटेक हेलिओ जी९६ने (MediaTek Helio G96) घेतली आहे. याचा मुख्य कॅमेरा १०८ मेगापिक्सेलचा असून १६ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत १८,७०० असून १२८जीबी स्टोरेज असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत २०,९०० रुपये असेल. तर, ८जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत जवळपास २२,४०० असेल.

रेडमी नोट ११प्रो (Redmi Note 11 Pro)

हा स्मार्टफोन दोन मॉडेल्समध्ये सादर केला जात आहे. ४जी आणि ५जी व्हेरिएंटमधील दोन्हीही फोन्स जवळपास सामान आहेत. रेडमी नोट ११प्रो ५जी आणि ४जी मध्ये सामान १२०Hz, ६.६७ इंच एमओएलईडी डिस्प्ले, ५०००एमएएच बॅटरी आणि १६ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे. या दोन फोन्समध्ये केवळ दोन बाबींमध्ये भिन्नता आहे, ती म्हणजे प्रोसेसर आणि किंमत.

रेडमी नोट ११प्रो ५जी मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६९५ एसओसी समाविष्ट असून ४जी मॉडेलमध्ये मीडियाटेक हेलिओ जी९६ (MediaTek Helio G96) प्रोसेसर आहे. दोन्हीही डिव्हाईस अँड्रॉइड ११ वर आधारित एमआययूआय १३ वर चालतात.

अपघात टाळण्यात अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टीम निभावते महत्त्वाची भूमिका; जाणून घ्या कसे करते काम

रेडमी नोट ११प्रो ४जी ची किंमत जवळपास २२,४०० पासून सुरु होते. ही किंमत ६जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या बेस पर्यायासाठी आहे. यासोबतच १२८जीबी स्टोरेजच्या पर्याय असणाऱ्या फोनची किंमत २४,७०० रुपये आहे. २६,३०० रुपयांमध्ये १२८जीबी स्टोरेज आणि ८जीबी रॅम असणारे मॉडेल दिले जाईल. ५जी आवृत्तीच्या सामान मेमरी मॉडेल्सची किंमत अनुक्रमे २४,७०० रुपये, २६,३०० रुपये आणि २८,४०० रुपयांच्या जवळपास आहे.

रेडमी नोट ११ आणि ११एस २८ आणि २९ जानेवारीला विक्रीसाठी उपलब्ध होतील. तसेच रेडमी नोट ११प्रो ४जी आणि ५जी १६ ते १७ फेब्रुवारीला अली एक्सप्रेसवर अर्ली बर्ड ऑफर्ससोबत विक्रीसाठी उपलब्ध होतील.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Redmi note 11 series launched in market know the features pvp
First published on: 27-01-2022 at 18:20 IST