scorecardresearch

Redmi Note 11T Pro+ आणि Redmi Note 11T Pro स्मार्टफोन २४ मे रोजी होतोय लॉंच, जाणून घ्या

Redmi Note 11T Pro + आणि Redmi Note 11T Pro स्मार्टफोन २४ मे रोजी लॉंच होणार आहे. कंपनीने गुरुवारी ही माहिती दिली. Redmi Note 11T Pro सीरीजच्या या दोन्ही फोन्समधून टर्बो-लेव्हल परफॉर्मन्स मिळवण्याचा खुलासा केला आहे.

redmi-launch
(फोटो-रेडमी)

Redmi Note 11T Pro + आणि Redmi Note 11T Pro स्मार्टफोन २४ मे रोजी लॉंच होणार आहे. कंपनीने गुरुवारी ही माहिती दिली. Redmi Note 11T Pro सीरीजच्या या दोन्ही फोन्समधून टर्बो-लेव्हल परफॉर्मन्स मिळवण्याचा खुलासा केला आहे. या व्यतिरिक्त असं देखील कळलंय की Redmi Note 11T Pro + दोन कलर ऑप्शन आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह लॉंच केला जाईल. रिपोर्ट्सनुसार, Redmi Note 11T Pro सीरीज Poco ब्रँडिंगसह जागतिक बाजारपेठेत आणली जाऊ शकते.

चीनमध्ये Redmi Note 11T Pro + आणि Redmi Note 11T लाँच झाल्याची माहिती चीनी मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट Redmi च्या अधिकृत Weibo अकाउंटवर शेअर करण्यात आली आहे. हा लाँच इव्हेंट २४ मे रोजी भारतीय वेळेनुसार ४.३० वाजता होणार आहे. Weibo वर रिलीज झालेल्या ताज्या टीझर्सवरून हे उघड झाले आहे.

अधिकृत लॉंचच्या आधी Xiaomi ने चीनमध्ये Redmi Note 11T Pro+ आणि Redmi Note 11T Pro साठी प्री-ऑर्डर घेणे सुरू केले आहे.

आणखी वाचा : Jio, Airtel, Vi: एकदा रिचार्ज करा वर्षभर फुकट बोला; जाणून घ्या काही भन्नाट प्लॅन्स

Redmi Note 11T Pro+, Redmi Note 11T Pro specifications
Xiaomi ने अद्याप लॉंचिंग संबंधित संपूर्ण माहिती शेअर केलेली नाही. Redmi Note 11T Pro+ आणि Redmi Note 11T Pro गेल्या महिन्यात चीनच्या सर्टिफिकेशन वेबसाइट TENAA वर दिसले होते. यापूर्वी असे मानले जात होते की हे मॉडेल Redmi Note 12 Pro सीरीजचे आहेत.

TENAA लिस्टिंगने उघड केले आहे की Redmi Note 11T Pro+ मध्ये 4300mAh क्षमतेची बॅटरी असू शकते. हा फोन मॉडेल नंबर 22041216UC सह होता. यात असंही दिसून आलं की Redmi Note 11T Pro मध्ये 4980mAh ची बॅटरी असेल. फोनचा मॉडेल क्रमांक 22041216C आहे.

Redmi Note 11T Pro मॉडेल्समध्ये ६.६ इंचाचा AMOLED डिस्प्ले 120 Hz रिजोल्यूशन FullHD + च्या रिफ्रेश रेटसह असू शकतो. याशिवाय हा फोन Android 12 आधारित MIUI 13 सह येईल. Xiaomi Redmi Note 11T Pro Plus आणि Redmi Note 11T Pro मध्ये MediaTek Dimensity chipsets दिले जाऊ शकतात. पण चिपसेटशी संबंधित माहिती अद्याप समोर आलेली नाही. Redmi Note 11T Pro जागतिक बाजारात POCO X4 GT नावाने देखील लॉंच केला जाऊ शकतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Redmi note 11t pro redmi note 11t pro launch may 24 features specifications prp

ताज्या बातम्या