भारतात १० ऑक्टोबर रोजी रेडमीने ‘Redmi Writing Pad’ लाँच केले आहे. नावाप्रमाणेच, हे उपकरण कागद आणि पेन न वापरता नोट्स, डूडल घेण्यासाठी आणि फक्त स्क्रिबलिंगसाठी एक पोर्टेबल डिजिटल नोटपॅड आहे. या उपकरणाच्या मदतीने चित्र काढणे, माहिती लिहिणे आणि स्क्रिबलिंग इत्यादी बरेच काही करता येणे शक्य आहे. Redmi रायटिंग पॅड परवडणाऱ्या किंमतीसह येतो. चला जाणून घेऊयात या नवीन उपकरणाबद्दल सविस्तर माहिती… 

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

Redmi Writing Pad ८.५-इंच लांबीच्या LCD डिस्प्लेसह येतो. पोर्टेबल डिजिटल नोटपॅड कॉम्पॅक्ट आणि हलके म्हणजे फक्त 90 ग्रॅमचे आहे. डिव्हाइसच्या बॉटमला असलेल्या बेझलवर एक बटण आहे, ज्याचा वापर स्क्रीन साफ ​​करण्यासाठी आणि लगेच काहीतरी नवीन तयार करण्यास प्रारंभ करण्यासाठी केला जाऊ शकतो. स्क्रीनवरून कंटेंट रिमूव्ह होण्यापासून रोखण्यासाठी डिव्हाइसमध्ये लॉक स्विच देखील आहे. रेडमी रायटिंग पॅड एका स्टायलससह येतो, जो एक सहज ग्रीप देतो. स्टाईलस डिव्हाइसच्या बाजूला मॅग्नेटिकरित्या अटॅच होऊ शकतो. हे रायटिंग पॅड मोबाइलप्रमाणे चार्जेबल नसून यात अल्ट्रा-लाँग बदलण्यायोग्य बॅटरी देण्यात आली आहे.  या Redmi रायटिंग पॅडची LCD स्‍क्रीन खूप कमी बॅटरी वापरते. Xiaomi चा दावा आहे की वापरकर्ता एका चार्जवर २०,००० पृष्ठांपर्यंत पर्यंत लिहू शकतो.

आणखी वाचा : सगळीकडे बोंबाबोंब…‘या’ दिवशी सादर होणार iPhone 15 किंमतबाबत झाला खुलासा

किंमत : 

रेडमी रायटिंग पॅडची किंमत ५९९ रुपये आहे. त्याबरोबरच, हे उपकरण Mi.com वर खरेदीसाठी उपलब्ध आहे.