scorecardresearch

Premium

Reliance Jio कडे आहेत ‘हे’ दोन भन्नाट प्लॅन्स; दररोज २.५ जीबी डेटासह मिळणार जिओटीव्हीचे मोफत सबस्क्रिप्शन

२०२३ च्या अखेरपर्यंत सर्व भागांमध्ये ५ जी नेटवर्क उपलब्ध करून देण्याचे जिओचे उद्दिष्ट आहे.

reliance jio daily 2.5 gb deta and benifits
जिओची ५ जी सेवा देशातील ७५४३ ठिकाणी उपलब्ध आहे. (Image Credit- Reuters)

रिलायन्स जिओ ही भारतातील सरावात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. जिओ कंपनी आपल्या ग्राहकांसाठी अनेक प्रीपेड प्लॅन्स ऑफर करते. ज्यात ग्राहकांना अनेक फायदे मिळतात. तसेच देशामध्ये सर्वात पहिले ५जी नेटवर्क रिलायन्स जिओने सुरु केले आहे. देशातील अनेक शहरांमध्ये जिओचे ५ जी नेटवर्क उपलब्ध असून, २०२३ च्या अखेरपर्यंत सर्व भागांमध्ये ५ जी नेटवर्क उपलब्ध करून देण्याचे जिओचे उद्दिष्ट आहे. तसेच कंपनीकडे असे काही प्लॅन्स आहेत ज्यात ग्राहकांना दररोज २.५ जीबी डेटा मिळतो. हे प्लॅन्स केवळ प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत परवडणारे आहेत. तसेच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड ५जी डेटा ऑफर केला जातो.

जिओची ५ जी सेवा देशातील ७५४३ ठिकाणी उपलब्ध आहे. आज आपण रिलायन्स जिओच्या दररोज २.५ जीबी डेटा मिळणाऱ्या प्लॅन्सबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. रिलायन्स जिओकडे २.५ जीबी दररोजचा डेटा मिळणारे दोन प्लॅन्स आहेत. हे प्लॅन्स ३९९ आणि २,९९९ रुपयांचे आहेत. त्यामधील एका प्लॅनमध्ये लॉन्ग टर्म वैधता मिळते. तर दुसऱ्या प्लॅनमध्ये शॉर्ट टर्म वैधता वापरकर्त्यांना मिळते. दोन्ही प्लॅन्स हे जिओ ५ जी वेलकम ऑफरसाठी पात्र आहेत हे लक्षात घेणे आवश्यक आहे. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.

Buy Apple Iphone 14 In Rupees 20,899 rs Flipkart Big Billion Days Sale
केवळ २०,८९९ रूपयांमध्ये iPhone 14 खरेदी करण्याची संधी; ‘या’ ठिकाणी मिळतोय डिस्काउंट, एकदा पाहाच
Itel S23+ launch wiht 5,000 mAh battery
VIDEO: Itel ने भारतात लॉन्च केला ५० मेगापिक्सलचा AI कॅमेरा असणारा ‘हा’ स्मार्टफोन; किंमत फक्त…
automatic security code verification
आता चॅटिंग होणार आणखी सुरक्षित; वापरकर्त्यांसाठी WhatsApp आणणार ‘हे’ फिचर, जाणून घ्या
poco x pro 5g big discount on flipkart
Poco च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट; जाणून घ्या हा फोन खरेदी करण्याची ४ कारणे

हेही वाचा : २९ तासांचा प्ले बॅक टाइम व ‘या’ फीचर्ससह भारतात लॉन्च झाले iPhone 15 Pro आणि Pro मॅक्स; किंमत…

जिओचा ३४९ रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओच्या ३४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ३० दिवसांची वैधता मिळते. ज्यामध्ये तुम्हाला दररोज २.५ जीबी डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये एकूण ७५ जीबी डेटा वापरण्यासाठी मिळतो. तसेच वापरकर्त्यांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि १०० एसएमएस दररोज तसेच जिओसिनेमा, जिओक्लाऊड आणि जीओटीव्हीचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.

जिओचा २,९९९ रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओच्या २,९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २.५ जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनची वैधता ३६५ दिवसांची आहे. अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस करता येतात. जिओसिनेमा, जिओक्लाऊड आणि जीओटीव्हीचा अतिरिक्त फायदे मिळतात. ५ सप्टेंबरपासून ते ३० सप्टेंबरपर्यंत रिलायन्स जिओ २१ जीबी बोनस डेटा MyJio अॅपवर ७ GB x ३ व्हाउचर) देखील देत आहे. वापरकर्त्यांना यात्रा, अजिओ, McDonalds, Netmeds आणि रिलायन्स डिजिटलवर देखील फायदे मिळतात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Relaince jio 2 5 daily deta 399 and 2999 rs plan offers at mcdonalds yatra check details tmb 01

First published on: 14-09-2023 at 09:48 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×