scorecardresearch

Premium

रिलायन्स जिओच्या ‘या’ प्लॅनमध्ये मिळते ३३६ दिवसांची वैधता; जिओ सिनेमासह वापरकर्त्यांना मिळणार…

रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे.

reliance jio 1559 long validity prepaid plans
रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी अनेक प्रीपेड प्लॅन्स ऑफर करत असते. (Image Credit-Financial Express)

रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. देशामध्ये सर्वात पहिल्यांदा जिओने ५ जी नेटवर्क सुरु केले आहे. २०२३ च्या अखेरपर्यंत देशाच्या सर्व भागांमध्ये ५ जी नेटवर्क सुरु करण्याचे जिओचे उद्दिष्ट आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी अनेक प्रीपेड प्लॅन्स ऑफर करत असते. ज्यात ग्राहकांना अनेक फायदे, ओटीटी प्लॅटफॉर्मचे फायदे मिळतात. ज्या ग्राहकांना जास्त वैधता असणारे प्लॅन्स हवे आहेत यांच्यासाठी जिओकडे अनेक प्रीपेड प्लॅन्स आहेत. ‘परवडणारा’ (affordable) या शब्दाचा उपयोग जास्त वैधता असणाऱ्या प्लॅन्सच्या किंमतीच्या संदर्भात वापरला आहे. जास्त वैधता असणाऱ्या जिओच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना कोणकोणते फायदे मिळणार आहेत ते जाणून घेऊयात.

Reliance Jio चा १,५५९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

रिलायन्स जिओच्या १,५५९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना ३३६ दिवसांची वैधता मिळते. यामध्ये २४ जीबी डेटा वापरायला मिळतो. हा एकरकमी असलेला डेटा प्लॅन आहे जो एका दिवसामध्ये वापरला जाऊ शकतो. आवश्यकता असल्यास अतिरिक्त डेटा खरेदी करण्यासाठी तुम्ही नेहमी डेटा प्रीपेड व्हाऊचरने रिचार्ज करता. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस करण्याचे फायदे मिळतात. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.

Lava Blaze Pro 5G Vs Itel S23+ comparison
Lava Blaze Pro 5G Vs Itel S23+: १५ हजारांच्या आतील कोणता स्मार्टफोन कॅमेरा आणि फीचर्समध्ये आहे बेस्ट? जाणून घ्या
Itel S23+ launch wiht 5,000 mAh battery
VIDEO: Itel ने भारतात लॉन्च केला ५० मेगापिक्सलचा AI कॅमेरा असणारा ‘हा’ स्मार्टफोन; किंमत फक्त…
bsnl offer 299 rs plan with daily 3 gb deta
रिलायन्स जिओ, एअरटेलपेक्षा BSNL च्या ‘या’ प्लॅनमध्ये मिळतो दररोज ३ जीबी डेटा, जाणून घ्या
honor 90 5g first sale started in amazon with offers
२०० मेगापिक्सलचा कॅमेरा असणाऱ्या Honor च्या स्मार्टफोनचा सेल ‘या’ प्लॅटफॉर्मवर आजपासून सुरु; ऑफर्स एकदा पाहाच

हेही वाचा : Flipkart Big Billion Days Sale 2023 : गुगलचा ‘हा’ ५२ हजारांचा स्मार्टफोन ८ हजारात खरेदीची संधी, काय आहे ऑफर?

तसेच १,५५९ रुपयांच्या प्लॅनमध्ये जिओ Apps, जिओक्लाऊड, जिओ टीव्ही आणि जिओसिनेमा सारखे अतिरिक्त फायदे देखील मिळतात. ज्या भागात ५जी नेटवर्क सुरु आहे . त्या भागातील वापरकर्ते या प्लॅनमध्ये ५जी नेटवरचा लाभ घेऊ शकतात. तसेच जिओचा कोणताही प्रीपेड प्लॅन ज्याची किंमत २४९ रुपये किंवा त्यापेक्षा अधिक आहे. असे प्लॅन खरेदी करणारे ५जी डेटा ऑफरसाठी पात्र आहेत. हा प्लॅन अशा लोकांसाठी उपयुक्त आहे ज्यांना जास्त वैधतेची आवश्यकता असते.

रिलायन्स जिओचे नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन असणारे प्लॅन्स

रिलायन्स जिओकडे असे दोन प्लॅन्स आहेत. हे प्लॅन्स जे वापरकर्ते नेटफ्लिक्ससाठी वेगळे पैसे भरतात त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. रिलायन्स जिओचे हे दोन्ही प्लॅन हे मोफत नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनसह येतात. रिलायन्स जिओद्वारे ऑफर करण्यात आलेले दोन पोस्टपेड प्लॅन्स हे अनुक्रमे ६९९ रुपये आणि १,४९९ रुपयांचे आहे. १,४९९ रुपयांचा प्लॅन हा जिओचा सर्वात महागडा पोस्टपेड प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएसचे फायदे मिळतात. या प्लॅनमध्ये एकूण ३०० जीबी डेटा मिळतो. यामध्ये नेटफ्लिक्स मोबाइलचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.  रिलायन्स जिओकडे ६९९ रुपयांचा एक पोस्टपेड प्लॅन आहे. ज्यात वापरकर्त्यांना १०० जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि ३ फॅमिली सिम (प्रत्येक सिम वॉर ५जीबी डेटा मिळतो.) मिळतात. प्रत्येक अतिरिक्त सिमची किंमत महिन्याला ९९ रुपये आहे. या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स बेसिक, Amazon प्राइम, जिओ टीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाऊडचे फायदे मिळतात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Reliance jio 1559 prepaid affordable plan with 336 days validiy 24 gb deta jiocloud and check all benifits tmb 01

First published on: 27-09-2023 at 17:47 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×