१ वर्षासाठी रिचार्जची चिंता नाही! Reliance Jio च्या परवडणाऱ्या प्लॅनमध्ये ७३० GB डेटा, अनलिमिटेड कॉल

हा रिचार्ज प्लॅन घेतल्यानंतर तुम्हाला १ वर्षासाठी रिचार्ज करण्याची गरज नाही.

Reliance-Jio

रिलायन्स जिओ सतत नवीन ग्राहक तयार करण्यावर भर देत आहे. मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील जिओकडे अनेक कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या किमतींसह प्रीपेड प्लॅन आहेत. जिओचे काही प्रीपेड प्लॅन देखील आहेत जे ३६५, ३३६ दिवसांच्या वैधतेसह येतात. म्हणजेच हे रिचार्ज प्लॅन घेतल्यानंतर तुम्हाला १ वर्षासाठी रिचार्ज करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला Jio च्या अशाच एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत ज्याची किंमत २,८७९ रुपये आहे. त्याबद्दल सर्व काही जाणून घ्या…

रिलायन्स जिओचा २,८७९ रुपयांचा रिचार्ज पॅक
२,८७९ रुपयांच्या Jio प्रीपेड प्लॅनची ​​वैधता ३६५ दिवसांची आहे. म्हणजेच एकदा रिचार्ज केल्यानंतर नंतर ३६५ दिवस रिचार्ज करण्याचं टेन्शन नाही. या प्रीपेड प्लॅनमध्ये जिओ दररोज २ जीबी डेटा देते. त्यानुसार ग्राहकांना एकूण ७३० GB हाय-स्पीड डेटा ऑफर करण्यात आला आहे. दररोज प्राप्त होणारा डेटा संपल्यानंतर वेग ६४ Kbps पर्यंत घसरतो.

जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल उपलब्ध आहेत. म्हणजेच ग्राहक देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल करू शकतात. Jio ग्राहकांना प्लॅनमध्ये दररोज १०० SMS देखील दिले जातात. याशिवाय रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना JioTV, JioCinema, Jio Security आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर करते.

आणखी वाचा : हे स्मार्टवॉच सांगेल तुम्हाला ताप आहे की नाही, जाणून घ्या किंमत आणि इतर फीचर्स

वर्षभराच्या वैधतेसह इतर Jio प्लॅन
याशिवाय जिओकडे २,९९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन आहे जो ३६५ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज २.५ जीबी डेटा मिळतो. प्लॅनमध्ये एकूण ९१२.५ GB ऑफर आहे. याशिवाय ग्राहक या प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिडेट व्हॉईस कॉल आणि १०० एसएमएसचाही लाभ घेऊ शकतात.

कंपनीकडे ३६५ दिवसांची वैधता असलेला आणखी एक प्लॅन आहे, ज्याची किंमत ४,१९९ रुपये आहे. या प्लॅनमध्ये दररोज ३ जीबी डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये ग्राहक एकूण १०९५ GB डेटाचा लाभ घेऊ शकतात. प्लॅनमध्ये दररोज अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि १०० एसएमएस मोफत उपलब्ध आहेत.

जिओच्या या प्लॅनमध्ये डिस्ने + हॉटस्टार मेंबरशिप देण्यात आली आहे. या पॅकमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहेत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Reliance jio 2879 rupees prepaid plan 365 days validity yearly plan 730gb data unlimited call prp

Next Story
हे स्मार्टवॉच सांगेल तुम्हाला ताप आहे की नाही, जाणून घ्या किंमत आणि इतर फीचर्स
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी