मोफत नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ, हॉटस्टार पाहा: ८०० रूपयांपेक्षाही कमी किमतीत ३ लोकांचा खर्च

जर तुम्ही इंटरनेट वापरत असाल तर तुम्हाला प्रति जीबी १० रुपये द्यावे लागतील. या प्लॅनमध्ये २०० GB डेटा रोलओव्हरची सुविधा देखील आहे. प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल्सची सुविधाही देण्यात आली आहे.

reliance-Jio-New-2

रिलायन्स जिओ गेल्या काही काळापासून सतत आपले पोस्टपेड ग्राहक वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील जिओकडे अनेक पोस्टपेड प्लॅन्स आहेत. Jio कडे ५९९ आणि ७९९ रुपयांचे फॅमिली पोस्टपेड प्लॅन देखील आहेत. या प्लॅनमध्ये प्रायमरी सिम कार्ड व्यतिरिक्त अतिरिक्त सिम कार्ड देखील दिले जातात. विशेष बाब म्हणजे जिओचे हे दोन्ही पोस्टपेड प्लॅन २०० GB डेटा रोलओव्हरच्या सुविधेसह येतात. आज आम्ही तुम्हाला रिलायन्स जिओच्या या दोन पोस्टपेड फॅमिली प्लॅनबद्दल सर्व काही सांगणार आहोत.

जिओ फॅमिली पोस्टपेड ५९९ रुपयांचा प्लॅनजिओच्या ५९९ रुपयांच्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनची वैधता एक बिल सायकल आहे. या प्लॅनमध्ये १०० GB डेटा देण्यात आला आहे. यानंतर जर तुम्ही इंटरनेट वापरत असाल तर तुम्हाला प्रति जीबी १० रुपये द्यावे लागतील. या प्लॅनमध्ये २०० GB डेटा रोलओव्हरची सुविधा देखील आहे. प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल्सची सुविधाही देण्यात आली आहे. नावाप्रमाणेच हा Jio चा कौटुंबिक पोस्टपेड प्लॅन आहे आणि प्रायमरी सिम कार्ड व्यतिरिक्त एक अतिरिक्त सिम कार्ड मिळतो. 

आणखी वाचा : जुन्या टीव्हीला करा टाटा बाय-बाय! १४ हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा Android स्मार्ट टीव्ही

याशिवाय जिओचा हा फॅमिली प्लॅन नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम, डिस्ने + हॉटस्टार, जिओ सिक्युरिटी, जिओ क्लाउड आणि जिओटीव्ही सारख्या OTT अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील ऑफर करतो. Amazon प्राइम व्हिडीओ सबस्क्रिप्शन १ वर्षासाठी वैध आहे. हा प्लॅन घेताना ग्राहकांना Jio Prime साठी ९९ रुपये देखील द्यावे लागतील.

७९९ रुपयांचा जिओ फॅमिली पोस्टपेड प्लॅन Jio चा  ७९९ रूपयांचा फॅमिली पोस्टपेड प्लॅन १ बिलिंग सायकलसाठी वैध आहे. या प्लॅनमध्ये १५० GB डेटा देण्यात आला आहे. यानंतर १० रुपये प्रति जीबी शुल्क भरावे लागेल. या प्लॅनमध्ये २०० GB डेटा रोलओव्हर सुविधा उपलब्ध आहे. Jio च्या या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये २ अतिरिक्त सिम कार्डांसह एकूण ३ सिम कार्ड उपलब्ध आहेत. याशिवाय या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स आणि दररोज १०० एसएमएस देखील दिले जातात.

आणखी वाचा : लॉंचपूर्वी मोठा खुलासा! Lava चा नवा फोन १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणार, ४ रिअर कॅमेरे

५९९ रुपयांच्या प्लॅनप्रमाणे हा कौटुंबिक प्लॅन नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, डिस्ने + हॉटस्टार, JioSecurity, Jio Cloud आणि JioTV सारख्या OTT अॅप्सचे मोफत सब्सक्रिप्शन देखील देतं. Amazon प्राइम व्हिडीओ सबस्क्रिप्शन १ वर्षासाठी वैध आहे. प्लॅन घेण्यासाठी ग्राहकांना Jio Prime साठी ९९ रुपये द्यावे लागतील.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Reliance jio 599 rupees 799 rupees family postpaid plan free netflix amazon prime video hostar ott apps for one year prp

Next Story
Vivo V25E स्मार्टफोन लवकरच भारतात दाखल होईल, संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी