scorecardresearch

Reliance Jio Value Plans: १९९ रुपयांपासून सुरू, ३३६ दिवसांपर्यंत वैधता, अनलिमिटेड कॉल आणि फ्री ऑफर

तुम्हाला रिलायन्स जिओच्या स्वस्त किमतीच्या प्लॅन्सची माहिती आहे का? मग ही माहिती नक्की वाचा.

Reliance Jio Value Plans: १९९ रुपयांपासून सुरू, ३३६ दिवसांपर्यंत वैधता, अनलिमिटेड कॉल आणि फ्री ऑफर
तुम्हाला रिलायन्स जिओच्या स्वस्त किमतीच्या प्लॅन्सची माहिती आहे का? मग ही माहिती नक्की वाचा.

रिलायन्स जिओकडे त्यांच्या टेलिकॉम ग्राहकांसाठी अनेक रेंजमध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स आहेत. कंपनीकडे अॅन्यूअल प्लॅन, प्रीपेड प्लॅन, पोस्टपेड प्लॅन, टॉप अप, 4G डेटा व्हाउचर, पॉप्युलर प्लॅन, टॉप ट्रेंडिंग प्लॅन आहे. तुम्हाला रिलायन्स जिओच्या स्वस्त किमतीच्या प्लॅन्सची माहिती आहे का? आम्ही तुम्हाला रिलायन्स जिओच्या अशा ३ प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत जे व्हॅल्यू कॅटेगरीमध्ये येतात. हे प्लॅन १९९ रुपयांपासून सुरू होतात.

रिलायन्स जिओ १,५५९ रुपयांचा व्हॅल्यू प्लॅन
रिलायन्स जिओच्या १,५५९ रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता ३३६ दिवसांची आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये २४ GB हाय-स्पीड 4G डेटा उपलब्ध आहे. हा डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड ६४ Kbps पर्यंत कमी होतो. जिओच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल ऑफर केले जातात. या प्लॅनमध्ये ग्राहकाला देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल्स मिळतात. जिओच्या या प्लॅनमध्ये एकूण ३६०० एसएमएस देण्यात आले आहेत.

आणखी वाचा : Reliance Jio: ३०० रूपयांपेक्षा कमी किमतीचे ११ रिचार्ज प्लॅन; अनलिमिटेड कॉल आणि डेटा…

रिलायन्स जिओ प्रीपेड प्लॅन JioTV, JioCinema, Jio Security आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन देतात.

रिलायन्स जिओचा ३९५ रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओच्या ३९५ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची ​​वैधता ८४ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण ६ GB हाय-स्पीड 4G डेटा देण्यात आला आहे. हा डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन ६४ Kbps होतो. जिओच्या या रिचार्ज पॅकमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉल उपलब्ध आहेत. याशिवाय या स्वस्त पॅकमध्ये १००० एसएमएस मोफत उपलब्ध आहेत.

रिलायन्स जिओच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सबस्क्रिप्शन प्लॅन ऑफर केले जातात.

रिलायन्स जिओचा १९९ रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओच्या १९९ रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता २८ दिवसांची आहे. या प्रीपेड पॅकमध्ये २ जीबी डेटा देण्यात आला आहे. प्लॅनमध्ये उपलब्ध डेटानंतर, ग्राहक ६४ Kbps स्पीडने डेटा वापरू शकतात. जिओच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉल उपलब्ध आहेत, याचा अर्थ ग्राहक देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड एसटीडी, स्थानिक आणि रोमिंग कॉल करू शकतात. या प्लॅनमध्ये ग्राहकांना ३०० एसएमएस मोफत मिळतात.

रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या