मागच्या काही दिवसात एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि रिलायन्स जिओने आपल्या प्रीपेड प्लान २० टक्क्यांनी वाढवले होते. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे. आता रिलायन्स जिओच्या नवीन प्रीपेड रिचार्जच्या किमती जाहीर केल्या आहेत. रिलायन्स जिओ १४ दिवसांपासून ते पूर्ण ३६५ दिवसांपर्यंतचे प्लान ऑफर करते. जिओच्या सर्व प्लानच्या किमती वाढल्या आहेत. जिओ वापरकर्त्यांसाठी कोणता प्लॅन त्यांच्यासाठी सर्वोत्तम काम असेल हे जाणून घेणे आता आवश्यक आहे. २०२२ या वर्षातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वोत्तम जिओ प्रीपेड प्लानची ​​यादी तयार केली आहे.

लाइट इंटरनेट यूजर्स: जिओचा हा प्लान लाइट इंटरनेट वापरकर्त्यांसाठी आहे. हा युजर्स अधूनमधून नेटचा वापर करतो, जसं WhatsApp संदेश पाठवण्यासाठी वगैरे. त्याच्यांसाठी ही रिलायन्स जिओची योजना आहे. ज्यांच्या घरी किंवा कामावर वायफाय आहेआणि जे मोबाईल डेटा जास्त वापरत नाहीत, अशांना या प्लानचा उपयोग होईल. तुम्ही जिओचा १ जीबी प्रतिदिन रिचार्ज प्लान निवडावा. या प्लानसाठी जिओ प्रीपेड रिचार्जची किंमत २०९ रुपये आहे. प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता उपलब्ध आहे. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्यासाठी अमर्यादित कॉलिंग फायदे उपलब्ध आहेत. प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे.

The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष
DRDO ACEM Nashik Recuritment 2024
DRDO ACEM नाशिकद्वारे अप्रेंटिसच्या पदासाठी होणार भरती! ३० एप्रिलपर्यंत करू शकता अर्ज, जाणून घ्या पात्रता निकष
Panvel Municipal Corporation
एका दिवसांत तीन कोटींहून अधिक कर जमा, पनवेल महापालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत ३३३ कोटी रुपये
penalty for car washes in bangalore
तहानलेल्या बंगळूरुमध्ये वाहने धुणाऱ्यांना दंड

मिडियम इंटरनेट यूजर्स: तुम्ही वारंवार सोशल मीडिया अ‍ॅपवर फोटो आणि व्हिडीओ डाउनलोड करत असाल आणि यूट्यूबवर व्हिडिओ पाहण्यासाठी एक चांगला पॅक शोधत असाल, तर १.५ जीबी प्रतिदिन जिओ पॅक तुमच्यासाठी योग्य आहे. २३९ रुपयांचा रिचार्ज करून तुम्ही २८ दिवसांची वैधता मिळवू शकता. याशिवाय, तुम्ही जिओच्या ६६६ प्लानसह रिचार्ज देखील करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला ८४ दिवसांच्या वैधतेसह दररोज १.५ जीबी मिळेल.

WhatsApp डेस्कटॉप यूजर्ससाठी जारी करणार नवं फिचर; जाणून घ्या

हेवी इंटरनेट यूजर्स: इंटरनेटचा सर्वाधिक वापर करणाऱ्यांसाठी हा प्लान आहे. इन्स्टाग्राम रील्स, फेसबुक व्हिडिओ, यूट्यूब व्हिडीओ आणि अधूनमधून नेटफ्लिक्स आणि हॉटस्टार चित्रपट किंवा शो पाहतात, अशांसाठी हा बेस्ट प्लान आहे. रिलायन्स जिओ प्रीपेड रिचार्ज प्लान तुमच्यासाठी दररोज २ जीबी पुरेसा असेल. २ जीबी दैनिक डेटासाठी, तुम्ही २९९ रुपयांचे रिचार्ज करू शकता, या प्लानची ​​वैधता २८ दिवस आहे. याशिवाय तुम्ही ७१९ रुपयांचा प्लान देखील घेऊ शकता, हा ८४ दिवसांचा प्लान आहे. तसेच तुम्ही १,०६६ रुपयांचा रिचार्ज करू शकता ज्याची वैधता ८४ दिवसांपर्यंत येते. प्लानमध्ये डिस्ने + हॉटस्टार सदस्यता विनामूल्य उपलब्ध आहे.