Reliance Jio True 5g 11 Cities : देशात ५ जी सेवा सुरू होऊन २ महिने उलटले असून या दरम्यान रिलायन्स जिओने अनेक शहरांमध्ये आपली ५ जी सेवा विस्तारली आहे. जिओने आज ११ शहरांमध्ये आपली Jio true 5g सेवा सुरू केली आहे. यामध्ये लखनऊ, त्रिवेंद्रम, मैसूर, नाशिक, औरंगाबाद, चंदीगढ, मोहाली, पंचकुला, जीरकपूर, खरड आणि डेराबस्सी या शहरांचा समावेश आहे.

जिओ ट्रू ५ जी सेवेशी जोडल्या गेलेल्या या ११ शहरांतील नागरिकांना जिओ वेलकम ऑफर दिला जात आहे. आमंत्रण देण्यात आलेल्या युजर्सना अतिरिक्त खर्चाशिवाय १ जीबीपीएस स्पीडसह अमर्यादित डेटा मिळेल.

international monetary fund praises india for maintaining fiscal discipline in election year
निवडणूक वर्षातही भारताकडून वित्तीय शिस्त कायम; आंतरराष्ट्रीय़ नाणेनिधीकडून कौतुक; आघाडीच्या देशांमध्ये स्थान कायम राहणार
stock market update sensex drops 454 points nifty settle at 21995 print
मंदीवाल्यांचा जोर कायम; ‘सेन्सेक्स’मध्ये ४५४ अंश घसरण
maharashtra sugar production, 108 lakh ton sugar production
यंदा मुबलक साखर; आतापर्यंत झाले ‘एवढे’ उत्पादन
Anant Goenka and Minister Piyush Goyal
‘तेजांकित’ तरुणच देशाचे भविष्य, केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांचे प्रतिपादन; ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ विजेत्यांचे विशेष कौतुक

(९९९ रुपयांमध्ये खरेदी करा ‘हे’ Earbuds, १५ तासांपेक्षा अधिक प्लेटाईम, जाणून घ्या माहिती)

एकाचवेळी ११ शहरांमध्ये ५ जी सेवा पुरवणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आम्ही ट्रू ५ जी सेवा उपलब्ध करणे सुरू केले तेव्हापासून हे आमच्या सर्वात मोठ्या लाँचपैकी एक आहे. महत्वाच्या पर्यटन स्थळांबरोबरच हे शहर आपल्या देशाचे प्रमुख शिक्षाकेंद्रदेखील आहेत. जिओ ट्रू ५ जी सेवेमुळे चांगले नेटवर्क मिळेल. याने ई गव्हर्नन्स, शिक्षण, ऑटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजेन्स, गेमिंग, आरोग्यसेवा, कृषी, आयटी आणि एसएमई व्यावसायांना मदत मिळेल, असे जिओच्या प्रवक्त्याने सांगितले.

(Galaxy Z Flip 3 स्मार्टफोनवर चक्क २३ हजारांची सूट, आणखी १७ हजारांची होऊ शकते बचत)

दहापेक्षा अधिक शहरांमध्ये जिओ ५ जी सेवा

जिओ ५ जी सेवा दहापेक्षा अधिक शहरांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, वाराणसी, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, नाथद्वार, पुणे, गुरुग्राम, नोएडा, गाझियाबाद, फरिदाबाद आणि इतर शहरांचा समावेश आहे. आज एकाचवेळी ११ नवीन शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे.