रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना दररोजच्या इंटरनेट डेटासह अनेक रिचार्ज प्लॅन्स ऑफर करतं. याशिवाय मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील कंपनीकडे 4G डेटा व्हाउचर, JioPhone डेटा अॅड-ऑन, नो डेली लिमिट, अॅन्यूअल प्लॅन अशा अनेक कॅटगरीमध्ये रिचार्ज प्लॅन आहेत. जर तुम्ही दिवसभर भरपूर डेटा वापरत असाल आणि असा प्रीपेड प्लान हवा असेल ज्यामध्ये दररोज ३ GB डेटा मिळत असेल, तर Jio ला अशा अनेक प्लॅन्स मिळतील. जिओचा १,१९९ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहे ज्यामध्ये दररोज ३ जीबी डेटा उपलब्ध आहे. रिलायन्स जिओच्या या रिचार्ज प्लॅनबद्दल सर्व काही जाणून घेऊया…

रिलायन्स जिओचा १,१९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
रिलायन्स जिओच्या १,१९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची वैधता ८४ दिवसांची आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज ३ जीबी डेटा दिला जातो. दररोज प्राप्त होणारा डेटा संपल्यानंतर, वेग ६४ kbps पर्यंत घसरतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण २५२ GB हाय-स्पीड डेटा देण्यात आला आहे.
याशिवाय जिओच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा देण्यात आली आहे. जिओच्या या प्रीपेड प्लॅनचे रिचार्ज करणारे ग्राहक देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर मोफत लोकल, एसटीडी आणि रोमिंग व्हॉइस कॉल करू शकतात. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १०० एसएमएस देखील दिले जातात.

लायन्स जिओच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते.

आणखी वाचा : Gmail मध्ये साइन इन होत नाही? तुमचं Account कसं कराल रिकव्हर, पाहा सोपी प्रोसेस

याशिवाय, रिलायन्स जिओसोबत, कंपनी ४,१९९ रुपयांच्या जिओ प्लॅनमध्ये दररोज ३ जीबी डेटा देखील देते. या प्लॅनमध्ये Disney + Hotstar प्रीमियम सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. कंपनी या प्रीपेड पॅकमध्ये अनलिमिटेड कॉल्स, एसएमएस सुविधा देखील प्रदान करते. याशिवाय ६०१ आणि ४०१ रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल आणि एसएमएस देखील दिले जातात. Jio च्या  ६०१ रूपयांच्या प्लॅनमध्ये Disney + Hotstar सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध आहे.