देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीपैकी एक असलेल्या रिलायन्स जिओने तीन नवीन JioFi रिचार्ज प्लॅन लॉन्च केले आहेत. कंपनीचे हे तीन नवीन प्लॅन पोस्टपेड आहेत आणि त्यांची वैधता एक महिन्याची आहे. कंपनीचे नवीन JioFi 4G वायरलेस हॉटस्पॉट खरेदी करून ग्राहक या योजनांचा लाभ घेऊ शकतील. Reliance Jio कंपनी मोफत JioFi डिव्हाइस ऑफर करते. परंतु ते रिटर्नेबलच्या अटींसह मिळतंय. रिलायन्स जिओचे नवीन रिचार्ज प्लॅन २४९ रुपये, २९९ रुपये आणि ३९९ रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आला आहे. Reliance JioFi रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घेऊया…

Reliance JioFi Recharge Plans

२४९ रुपयांचा JioFi रिचार्ज प्लॅन
JioFi २४९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये कंपनी ग्राहकांना ३० GB डेटा ऑफर करते. लक्षात घ्या की या प्लॅनमध्ये एसएमएस किंवा व्हॉइस कॉलची सुविधा उपलब्ध नाही. या प्लॅनसोबत येणारा JioFi डोंगल रिटर्नेबलच्या कंडिशनसह येतो आणि त्याचा लॉक-इन कालावधी १८ महिन्यांचा आहे.

Samsung launched on Friday a new variant of its popular budget F15 smartphone Here is all the details
२० हजारांपेक्षा कमी किमतीत सॅमसंगचा ट्रिपल कॅमेरा सेटअपचा स्मार्टफोन; बॅटरी लाईफ बघून म्हणाल ‘डील Done’
IIFL Finance, selling shares, shareholders
आयआयएफएल फायनान्स हक्कभाग विक्रीद्वारे १,२७२ कोटी रुपये उभारणार
image and signature of Dr Babasaheb Ambedkar, pen, writing wonders of pune
घटनाकारांची छबी, स्वाक्षरी आता लेखणीवर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सिग्नेचर पेनच्या आवृत्तीचे अनावरण
ED
‘व्हीआयपीएस’ कंपनीची २४ कोटींची मालमत्ता जप्त; पुण्यात ‘ईडी’ची कारवाई; संचालक दुबईत पसार

आणखी वाचा : उकाड्यात थंडावा! ३० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतोय ब्रँडेड एसी, खिडकीत बसवू शकता

२९९ रुपयांचा JioFi रिचार्ज प्लॅन
२९९ रुपयांच्या JioFi रिचार्ज प्लॅनमध्ये दरमहा ४० GB डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये कोणतीही व्हॉइस कॉलिंग किंवा एसएमएसची सुविधा नाही. JioFi डोंगलचा लॉक-इन कालावधी केवळ १८ महिने आहे.

आणखी वाचा : घरी बसून रेल्वे तिकीट कॅन्सल करू शकता, पैसे परत मिळणार, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

३४९ रुपयांचा JioFi रिचार्ज प्लॅन
रिलायन्स जिओच्या ग्राहकांना ३४९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ५० जीबी डेटा दिला जातो. JioFi डोंगलचा लॉक-इन कालावधी केवळ १८ महिन्यांचा आहे आणि इतर प्लॅनप्रमाणे यामध्येही व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस सुविधा प्रदान केलेली नाही. JioFi पोस्टपेड ऑफर फक्त रजिस्टर्ड बिजनेस युजर्ससाठी आहेत. त्यामुळे पोस्टपेड प्लॅन मिळवण्यासाठी किमान २०० रुपयांचा पहिला रिचार्ज प्लॅन असावा. JioFi च्या वेबसाइटनुसार, मासिक हाय-स्पीड डेटा संपल्यानंतर, इंटरनेट स्पीड 64Kbps पर्यंत घसरेल.

JioFi डोंगलचा वापर पर्सनल हॉटस्पॉट तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. 4G नेटवर्क कनेक्टिव्हिटीद्वारे युजर्स त्यांच्या सोयीनुसार कुठेही इंटरनेट चालवू शकतात.