Jio Unlimited plan for IPL 2025: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) चा उत्साह आता आणखी वाढणार आहे, कारण जिओने क्रिकेट चाहत्यांसाठी एक जबरदस्त रिचार्ज प्लॅन आणला आहे. आयपीएल २०२५ ची सुरुवात २२ मार्च रोजी होणार आहे. पहिला सामना गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात होणार आहे. या खास क्रिकेट हंगामात प्रेक्षकांना हाय क्वालिटी स्ट्रीमिंग अनुभव देण्यासाठी जिओने त्यांच्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे.
या ऑफर अंतर्गत सध्याच्या आणि नवीन जिओ सिम ग्राहकांना ९० दिवसांसाठी जिओहॉटस्टार अॅक्सेस मोफत मिळेल, यामुळे क्रिकेटप्रेमी ग्राहकांना आयपीएल २०२५ चे सर्व सामने त्यांच्या मोबाइल आणि टीव्हीवर 4K क्वालिटीसह ते पाहू शकतील. याशिवाय ग्राहकांना ५० दिवसांसाठी मोफत Jio/Fiber आणि Jio/Fiber ट्रायल कनेक्शन मिळेल, जे हाय-स्पीड इंटरनेट आणि उत्तम घरगुती मनोरंजनाचा अनुभव देईल. यात ८००+ टीव्ही चॅनेल, ११+ ओटीटी अॅप्स आणि अनलिमिटेड वाय-फायची सुविधा मिळेल. पण, ऑफरवरील फायदे मिळविण्यासाठी ग्राहकांना फक्त ₹ २९९ किंवा त्याहून अधिक किमतीच्या प्लॅनचा रिचार्ज करावा लागेल.
या ऑफरचा फायदा कसा मिळवायचा?
१) ही ऑफर १७ मार्च ते ३१ मार्च २०२५ दरम्यान एक्टिवेट केली जाईल.
२) सध्याच्या जिओ सिम युजर्सना या ऑफर्सचा फायदा मिळवण्यासाठी २९९ रुपये किंवा त्याहून अधिक किमतीच्या प्लॅनचा रिचार्ज करावा लागेल.
३) नवीन जिओ सिम युजर्स नवीन जिओ सिम खरेदी करुन २९९ रुपये किंवा त्याहून अधिक किमतीच्या प्लॅन खरेदी करुन ही ऑफर एक्टिव करु शकता.
१७ मार्चपूर्वी रिचार्ज केलेले ग्राहक १०० रुपयांच्या अॅड-ऑन पॅकसह या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. जिओहॉटस्टार पॅक २२ मार्च २०२५ पासून ९० दिवसांसाठी सक्रिय असेल, ज्यामुळे ग्राहकांना आयपीएलच्या पहिल्या सामन्यापासून या ऑफरचा आनंद घेता येईल.
ऑफर कशी सक्रिय करायची?
ऑफरबद्दल अधिक माहितीसाठी ग्राहक ६०००८-६०००८ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकतात. याशिवाय, जिओ युजर्स jio.com ला भेट देऊन किंवा जवळच्या जिओ स्टोअरमध्ये जाऊन या ऑफर्सची माहिती घेऊ शकतात. ही ऑफर JioAiCloud द्वारे समर्थित आहे.
जिओ अनलिमिटेड ऑफर प्लॅन व्यतिरिक्त पाहा हे इतर बेस्ट प्लॅन्स
४४८ रुपयांचा प्लॅन
जर तुम्हाला फक्त व्हॉइस कॉलिंग प्लॅन पाहिजे असल्यास जिओचा ४४८ रुपयांचा प्लॅन हा एक चांगला पर्याय असू शकतो. या प्लॅनमध्ये ८४ दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि १००० मोफत एसएमएसची सुविधा मिळते. याशिवाय युजर्सना JioTV चा मोफत अॅक्सेसदेखील मिळेल. या प्लॅनमध्ये JioCinema च्या बेसिक व्हर्जनची सुविधा मिळेल. पण, ग्राहकांना प्रीमियम व्हर्जनची सुविधा यात नसेल.
१,७४८ रुपयांचा प्लॅन
तुम्ही जास्त कालावधीसाठी व्हॉइस-ओन्ली प्लॅन शोधत असाल तर जिओच्या १,७४८ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला ३३६ दिवसांसाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळेल. यामध्ये युजर्सना एकूण ३,६०० मोफत एसएमएसची सुविधादेखील मिळते. तसेच तुम्हाला JioTV चा मोफत अॅक्सेस मिळेल. JioCinema चे बेसिक व्हर्जन उपलब्ध असेल, परंतु त्याचे प्रीमियम व्हर्जन या प्लॅनमध्ये समाविष्ट नाही.