रिलायन्स जिओ ही गेल्या काही वर्षात सर्वात जास्त ग्राहक असलेली टेलिकॉम कंपनी बनली आहे. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील जिओकडे दररोज ०.५ जीबी, १ जीबी, २ जीबी, १.५ जीबी, ३ जीबी डेटासह रिचार्च प्लॅन आहेत. कंपनीचे असे एकूण ७ रिचार्ज प्लॅन आहेत ज्यात दररोज २ GB डेटा मिळतो. २ जीबी डेटा प्लॅन अशा युजर्ससाठी फायदेशीर आहे जे खूप कमी किंवा जास्त डेटा वापरत नाहीत. आज आम्ही तुम्हाला रिलायन्स जिओच्या सर्व रिचार्ज प्लॅनबद्दल माहिती सांगत आहोत. हे प्लॅन २४९ रुपयांपासून सुरू होतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२८७९ रुपयांचा जिओ प्रीपेड पॅक
रिलायन्स जिओच्या २८७९ रूपयांच्या प्रीपेड पॅकची वैधता ३६५ दिवस म्हणजे १ वर्ष आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ GB डेटानुसार एकूण ७३० GB हाय-स्पीड डेटा दिला जातो. दररोज उपलब्ध असलेला हाय-स्पीड डेटा संपल्यानंतर, वेग ६४ Kbps पर्यंत घसरतो. प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल उपलब्ध आहेत. याशिवाय कंपनी या प्लॅनमध्ये १०० एसएमएस फ्री देते. याशिवाय ग्राहकांना या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सारख्या अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शनही मिळते.

Jio प्रीपेड १०६६ रुपयांचा प्लान
रिलायन्स जिओच्या १,०६६ रुपयांच्या प्रीपेड पॅकची वैधता ८४ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज २ GB व्यतिरिक्त ५ GB अतिरिक्त डेटा दिला जातो. म्हणजेच ग्राहक एकूण १७३ जीबी डेटाचा लाभ घेऊ शकतात. दररोज २ GB डेटा उपलब्ध झाल्यानंतर, वेग ६४ Kbps पर्यंत खाली येतो.

जिओच्या या प्लॅनमध्ये डिस्ने + हॉटस्टार सुविधा १ वर्षासाठी उपलब्ध आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये Disney + Hotstar, JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे सबस्क्रिप्शन देखील मोफत दिले जाते.

आणखी वाचा : SBI ची नवी ऑफर! हजारो रुपयांचा फायदा, एसी, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदीवर १७.५ टक्के कॅशबॅक

जिओचा ७९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन
जिओच्या ७९९ रुपयांच्या जिओ प्रीपेड प्लॅनची ​​वैधता ५६ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच ग्राहक एकूण ११२ जीबी डेटाचा लाभ घेऊ शकतात. दैनंदिन डेटा संपल्यानंतर वेग ६४ Kbps पर्यंत घसरतो. याशिवाय प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधाही आहे. या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस दिले जातात.

रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये Disney + Hotstar, JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud उपलब्ध आहेत.

७१९ रुपयांचा जिओ प्रीपेड प्लॅन
७१९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची ​​वैधता ८४ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटानुसार एकूण १६८ जीबी डेटा दिला जातो. दररोज प्राप्त होणारा डेटा संपल्यानंतर वेग ६४ Kbps पर्यंत घसरतो. या प्लॅनमध्ये दररोज अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि १०० एसएमएस उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema, Jio सिक्युरिटी आणि JioCloud सुविधाही देण्यात आल्या आहेत.

५३३ रुपयांचा जिओ प्रीपेड प्लॅन
जिओच्या ५३३ रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता ५६ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये देखील दररोज २ जीबी डेटा दररोज दिला जातो. म्हणजेच ग्राहकांना एकूण ११२ GB हाय-स्पीड डेटा मिळतो. दररोज प्राप्त होणारा डेटा संपल्यानंतर, वेग ६४ Kbps पर्यंत घसरतो. या प्लॅनमध्ये दररोज अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि १०० एसएमएस उपलब्ध आहेत. याशिवाय Jio च्या या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे सबस्क्रिप्शन मोफत दिले जाते.

आणखी वाचा : पहिल्यांदाच अशी ऑफर! Xiaomi ५० इंचाचा 4K अल्ट्रा HD Android TV वर ८ हजार रूपयांचा डिस्काउंट

जिओचा २९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन
Jio च्या २९९ रुपयांच्या Jio प्रीपेड प्लॅनची ​​वैधता २८ दिवस आहे. या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा देखील दिला जातो. प्लॅनमध्ये ग्राहक एकूण ५६ GB हाय-स्पीड डेटा वापरू शकतात. दररोज प्राप्त होणारा डेटा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग ६४ Kbps पर्यंत घसरतो. याशिवाय प्लॅनमध्ये दररोज अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि १०० एसएमएस उपलब्ध आहेत. Jio च्या या प्रीपेड पॅकमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे सबस्क्रिप्शन मोफत दिले जाते.

जिओचा २४९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन
२४९ रुपयांच्या Jio प्रीपेड पॅकची वैधता २३ दिवस आहे. या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच एकूण ४६ GB हाय-स्पीड डेटा देण्यात आला आहे. दररोज प्राप्त होणारा डेटा संपल्यानंतर, डेटाचा वेग ६४ Kbps पर्यंत खाली येतो. या प्लॅनमध्ये दररोज अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि १०० एसएमएस उपलब्ध आहेत. Jio च्या या पॅकमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे सबस्क्रिप्शन मोफत दिले जाते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance jio prepaid plan 2gb daily data pack unlimited voice call sms free offers 249 rupees to 2879 rupees prp
First published on: 27-06-2022 at 19:32 IST