Reliance Jio Top Trending Plans: रिलायन्स जिओचे टॉप ट्रेंडिंग प्लान आहेत. या जिओ प्लॅन्समध्ये अमर्यादित व्हॉइस कॉल, डेटा ऑफर केला जातो. जिओचे एकूण ७ प्रीपेड प्लॅन आहेत जे टॉप ट्रेंडिंग प्लॅन्सच्या श्रेणीत येतात. आम्‍ही तुम्‍हाला जिओच्‍या परवडणार्‍या टॉप ट्रेंडिंग प्‍लॅनबद्दल सांगत आहोत ज्यांची किंमत ५०० रुपयांपेक्षा कमी आहे. जिओच्या ४९९ रुपये, ३३३ रुपये आणि २९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व फायद्यांबद्दल जाणून घ्या.

रिलायन्स जिओचा ४९९ रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओच्या ४९९ रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता २८ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा मिळतो. जिओच्या या पॅकमध्ये एकूण ५६ जीबी डेटा देण्यात आला आहे. तसंच दररोज ऑफर केलेला डेटा संपल्यानंतर, वेग मर्यादा ६४Kbps इतकी आहे. प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स मिळतात. ग्राहक कोणत्याही नेटवर्कवर देशभरात स्थानिक, एसटीडी आणि रोमिंग कॉलचा आनंद घेऊ शकतात. याशिवाय या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस देखील उपलब्ध आहेत. Jio च्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना १ वर्षासाठी Disney + Hotstar सबस्क्रिप्शन ऑफर केले जाते. याशिवाय JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे सदस्यत्व देखील मोफत आहे.

( हे ही वाचा: Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलची तारीख झाली जाहीर; iPhone 13 सह अनेक वस्तू मिळतील अर्ध्या किंमतीत)

रिलायन्स जिओचा ३३३ रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओच्या ३३३ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. या प्लॅनची ​​वैधता २८ दिवसांची आहे. प्लॅनमध्ये एकूण ४२ जीबी डेटा उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये उपलब्ध दैनिक डेटा संपल्यानंतर, स्पीड ६४Kbps पर्यंत कमी होतो. जिओच्या या प्रीपेड पॅकमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि १०० SMS दररोज ऑफर केले जातात.रिलायन्स जिओचा हा प्लॅन डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन ३ महिन्यांसाठी मोफत देतो. या रिचार्ज पॅकमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सदस्यत्व देखील विनामूल्य आहे.

रिलायन्स जिओचा २९९ रुपयांचा प्लान

रिलायन्स जिओच्या २९९ रुपयांच्या रिचार्ज पॅकची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच, ग्राहक एकूण ५६जीबी हाय-स्पीड डेटा वापरू शकतात. दररोज मिळणारा डेटा संपल्यानंतर ६४Kbps वेगाने इंटरनेट वापरता येते. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा देण्यात आली आहे. जिओच्या या रिचार्ज पॅकमध्ये दररोज १०० एसएमएस उपलब्ध आहेत. Jio च्या या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.