कधीतरी असा प्रसंग येतो की तुम्हाला तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला इतर कोणत्यातरी शहरामधून किंवा दुरुन त्यांच्या स्मार्टफोनमधील गोष्टी समजवून सांगायच्या असतात. या गोष्टींमध्ये कधी सेटिंगबद्दलचा गोंधळ असतो तर कधी एखादा पर्याय अथवा तांत्रिक अडचण का निर्माण झालीय याबद्दलचं शंका निरसन करण्याचा प्रयत्न असतो. सामान्यपणे वयस्कर व्यक्ती किंवा पालकांना एखादा पर्याय शोधून किंवा समजून सांगताना दुरुन व्हिडीओ कॉलमधून अथवा तोंडी सांगणं कठीण जातं. अशावेळी आपल्याला तो स्मार्टफोन बसल्या जागेवरुन हाताळता आला असता तर किती बरं झालं असतं असं वाटू लागतं. मुख्यतः टाळेबंदीच्या काळात लोकांना याची गरज जास्त भासली असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्यापैकी बऱ्याच जणांना यातील ट्रिक माहित असेलच पण अनेकांना अजूनही माहित नाही की बाजारात असे काही सॉफ्टवेअर आणि अ‍ॅप उपलब्ध आहेत ज्यामुळे आपण ही गोष्ट सहज साध्य करू शकतो. एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणच्या लॅपटॉप-स्मार्टफोनमध्ये तुम्हाला प्रवेश हवा असेल किंवा एखाद्या लांब राहणाऱ्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्या लॅपटॉप-स्मार्टफोनमध्ये प्रवेश द्यायचा असेल तर यासाठी टीमव्ह्यूअर अ‍ॅप आपल्याला मदत करू शकतो. तर जाणून घेऊया टीमव्ह्यूअर अ‍ॅपच्या मदतीने आपण एखादे अँड्रॉईड डिव्हाईस किंवा लॅपटॉप लांब असून सुद्धा कसे हाताळू शकतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Remotely control or access any android phone or laptop using this app pvp
First published on: 06-01-2022 at 13:50 IST